महिलेसमोर हॉटेल कर्मचाऱ्याचे हस्तमैथुन; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

महिलेसमोर हॉटेल कर्मचाऱ्याचे हस्तमैथुन; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

आरोपीला अटक

एका सोबो चायनीज रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेसमोर हस्तमैथुन केल्याप्रकरणी त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आलमगीर बकुर्ली मंडळ (२१) असे आरोपीचे नाव असून ही घटना मरीन लाइन्स इथे घडल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्यांनी महिलेसमोर अश्लील प्रकार केल्याप्रकरणी महिलेने एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्याला तात्काळ आरोपीला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

मरीन लाइन्स येथील पारसी डेरी याठिकाणी एक महिला सकाळच्या सुमारास मोबाईलवर बोलत बसली होती. मोबाईलवर बोलून झाल्यानंतर महिलेने फोन ठेवत समोर पाहिले असता, तिच्यासमोर एक व्यक्ती अश्लील प्रकार करताना तिला दिसला. तिने सर्वप्रथम त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. मात्र, तरी देखील त्यांनी गैरवर्तन सुरुच ठेवले. अखेर या महिलेने आरडाओरड केला. त्यानंतर आरोपीने त्या ठिकाणाहून पळ काढला. दरम्यान, महिलेने एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; ही महिला एका परदेशी दूतावासात कामाला असून ही महिला पारसी डेरी याठिकाणी सकाळच्या सुमारास बसली होती. त्यावेळी एका सोबो चायनीज रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी महिलेसमोर अश्लील चाळे केले. दरम्याम, ही घटना मरीन लाईन्सला बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास करीत त्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेवरुन पुन्हा एकदा सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – पाणी जपून वापरा; मुंबईच्या काही भागात आज १५ टक्के पाणी कपात


 

First Published on: February 17, 2020 1:32 PM
Exit mobile version