गावी गेलेले कामगार विमानाने मुंबईत परतले

गावी गेलेले कामगार विमानाने मुंबईत परतले

गावी गेलेले कामगार विमानाने मुंबईत परतले

कोरेानाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यांनतर हाताला काम नसल्याने मिळेल त्या वाहनाने गावी परतलेले कामगार आता पुन्हा मुंबईत परतू लागले आहे. मात्र, रेल्वे गाडीतून धक्का खात गेलेले हे कामगार खास जेट विमानाने मुंबईत परतू लागले आहेत. मुंबईतील एका मोठ्या बांधकाम विकासक असलेल्या ग्रुप कंपनीने चक्क आपल्या कामगारांना मुंबईत आणण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली. त्यामुळे कधीही विमानात न बसणाऱ्या कामगारांनी पहिल्या वहिल्या विमान प्रवासाचा आनंद लुटत मुंबई गाठली आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे बांधकाम प्रकल्प, विकासकामे ठप्प झाली आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व कामेच बंद राहिल्याने कामगारांनी कोरोनाच्या भीतीने गावाचा रस्ता धरला. परंतु, मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना आपली बांधकामे सोशल डिस्टन्सिंग राखत सुरु ठेवता येतील, अशाप्रकारची परवानगी मुंबई महापालिकेने दिली होती. परंतु, कामगारच गेल्यामुळे अनेक इमारत बांधकामे सुरु करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे मुंबईतील अनेक बांधकामे ठप्प झाली होती. परंतु, मागील ८ जूनपासून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर आणि कोरेानाचा आजार थोडाफार नियंत्रणात येत असल्याचे दिसून आल्यानंतर काही कामगार पुन्हा मुंबईत परतू लागले आहे.

मुंबईतील बांधकाम व्यावसायिक ग्रुपमधील अविघ्नन ग्रुप कंपनीने आपल्या वरळी येथील बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या पुन्हा मुंबईत आणण्यासाठी खास विमानाची व्यवस्था केली. वरळीतील बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे ५८ कामगार विमानाने बंगालमधील बागडोरा येथून मुंबईत परतले आहे. मुंबईतील अनेक बांधकामांच्या ठिकाणी कामगारांचे पाच ते सहा महिन्यांचे पगार न दिल्याने अनेक कामगार नाराज होत गावी निघून गेले होते. परंतु, अविघ्न ग्रुपने आपल्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या कामगारांची विशेष काळजी घेत लॉकडाऊनच्या काळात त्यांची जेवणाची इतर व्यवस्था करत विशेष काळजी घेतली होती. एवढेच नाही तर गावी गेल्यानंतरही ते त्यांच्या संपर्कात राहून पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला. कोरोना संबंधात शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे पालन करत बांधकामाला सुरुवात केली जाईल, असे अविघ्न ग्रुपने म्हटले आहे.

पश्चिम बंगालमधून हे सर्व कामगारांना मुंबईत आले असून पुन्हा एका वरळीतील बांधकामाच्या ठिकाणी ते कामाला लागले आहेत. मात्र, अशाप्रकारे विमानाने मुंबईत येण्याची व्यवस्था केल्यामुळे कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंदही मावेनासा झाला होता. त्यामुळे कंपनीप्रती असलेली आदर भावनाही कामगारांनी व्यक्त केली. घाबरुन गावी गेलेल्या कामगारांना पुन्हा मुंबईत हिंमत निर्माण करून त्यांना विमानाने आणण्याची ही पहिलाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईतील महापालिकेची मार्केट पुन्हा गजबजणार


 

First Published on: June 24, 2020 10:31 PM
Exit mobile version