कामधंदा नाही, हाताशी पैसेही नाहीत : मजूरांची दयनिय अवस्था

कामधंदा नाही, हाताशी पैसेही नाहीत : मजूरांची दयनिय अवस्था

पायी जाणारे शेकडो परप्रांतीय कामगार पोलिसांच्या ताब्यात

कोरोनामुळे देशरात लॉकडाऊन असल्याने सर्वच कामे ठप्प झाली आहेत त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार बुडाले आहेत. काम धंदा नसल्याने आता हाताशी असलेले पैसेही संपल्याने आता पोट कसे भरायचे? अशा विवंचनेत असलेले शेकडो कामगार उत्तरप्रदेश येथील आपल्या गावी पायी जात असतानाच कल्याणच्या पेालिसांनी त्यांना मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मजूरांची दयनिय अवस्था समोर आली आहे.

पायी जाणारे शेकडो परप्रांतीय कामगार पोलिसांच्या ताब्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परिणामी अनेक उद्योग-व्यवसाय गेल्या महिन्याभरापासून ठप्प पडल्याने कामगारांची गैरसोय होत आहे. त्यातही यामध्ये परप्रांतीय मजूरांची संख्या बरीच मोठी आहे. रोज कमावणार आणि खाणार, असे हातावर पोट असणारे कामगार दयनिय अवस्थेत जीवन जगत आहेत. गावी गेलो तर कसं तरी पोट तरी भरता येईल, मुंबईत पोट कसं भरणार घर भाडं कुठून देणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे. राज्याच्या विविध भागातून मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या पध्द्तीने लपून छपून हे परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांत असे अनेक प्रकार समोर आले असून आता कल्याणातही हा प्रकार घडला आहे. मध्यरात्री ३ च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकातून सुमारे अडीचशेच्या आसपास कामगार पायी चालत जात होते.

पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर ते पटना (बिहार), इलाहाबादला जात (उत्तरप्रदेश) असल्याचे आढळून आले. एमआयडीसी बंद आहे. त्यामुळे हाताला कामधंदा नाही जवळ असलेले पैसे ही खर्च झाले आता खाणार काय? आणि इकडे राहिलो तर घरभाडे द्यावे लागेल. त्यामुळे गावी जात असल्याचे राजेंद्र साहू या कामगाराने सांगितले. तसेच या सर्व मजुरांना कल्याण पश्चिमेतील सुभाष मैदान परिसरात आणून महापालिकाने त्यांची जेवणाची व्यवस्था केली. हे सर्व डोंबिवलीच्या टाटा पॉवर,सोनारपाडा परिसरातील चाळींमध्ये राहतात. सर्व केडीएमसी वैद्यकीय पथकाने सर्व मजुरांची तपासणी करून त्यांना महाजन वाडी हॉल आणि महावीर हॉल मध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


हेही वाचा – निम्म्या मुंबईत कोरोनाचा हाहाकार; अवघ्या सहा दिवसांमध्ये वाढले १५०९ रुग्ण


 

First Published on: April 22, 2020 11:11 PM
Exit mobile version