वरळी, प्रभादेवीकरांनो सावध व्हा! जी-दक्षिण विभागात १३३ कोरोनाबाधित

वरळी, प्रभादेवीकरांनो सावध व्हा! जी-दक्षिण विभागात १३३ कोरोनाबाधित

वरळी, प्रभादेवीकरांनो सावध व्हा! जी-दक्षिण विभागात १३३ कोरोनाबाधित

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या आता अधिकच वाढू लागली असून वरळी, प्रभादेवी या महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील आकडा वाढतच चालला आहे. काल एकाच दिवशी या विभागात आणखी ५५ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत जी-दक्षिण विभागात कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठलेला आहे. महापालिकेच्या अहवालानुसार या विभागात आतापर्यंत १३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे दिसत आहे. मुंबईतील इतर विभागांमध्ये तेवढी गंभीर परिस्थिती नसली तरी जी-दक्षिण विभागातील वाढती रुग्ण संख्या ही मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. विशेष म्हणजे काल टॉप फाईव्ह नसलेल्या वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच पूर्व विभागात रुग्ण संख्या वाढली आहे. या विभागातील एकूण रुग्णांची संख्या ३३ एवढी झाली आहे. त्यामुळे या वाढलेल्या रुग्णांमुळे के-पूर्व विभाग मागे पडला आहे. परंतु एच-पूर्व बरोबर पी-उत्तर विभागही रुग्णसंख्येत वरच्या क्रमांकावर ढकलला गेला आहे.

एच पूर्व विभागात संख्या वाढली

जी-दक्षिण विभागापाठोपाठ भायखळा, चिंचपोकळी, माझगाव या ई विभागात आणखी ९ रुग्णांची भर पडली आहे. या विभागातील रुग्णांची संख्या आता ४८ वरून ५९ एवढी झाली आहे. तर मलबार हिल, ताडदेव, ग्रँटरोड या डि विभागातही ४३ वरुन रुग्णांची संख्या ४७ एवढी झाली आहे. तर विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिम विभागात ४० वरून ४३ आणि वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच पूर्व विभागात २६ वरून ३३ एवढी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली.

एच-पूर्व विभागातील मातोश्री परिसर तसेच वांद्रे बेहरामपाड्याचा समावेश आहे. त्यामुळे या विभागातील रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे ही संख्या एकाच दिवशी ७ ने वाढली आहे. ७ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची वॉर्डनिहाय आकडेवारी

सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून पहिले पाच वॉर्ड

सर्वात कमी पॉझिटिव्ह रुग्ण असलेले टॉप फाईव्ह विभाग

First Published on: April 8, 2020 4:08 PM
Exit mobile version