महापालिकेच्या रुग्णालयातून मोबाईलवर दिली जाते एक्स-रे कॉपी

महापालिकेच्या रुग्णालयातून मोबाईलवर दिली जाते एक्स-रे कॉपी

Muncipalty Hospital

वसई:-अद्यावत सोयींनी सुसज्ज अशी जाहीरात करून चार वर्षांपुर्वी सुरु करण्यात आलेल्या महापालिकेच्या रुग्णालयातून मोबाईलवर एक्स-रे कॉपी दिली जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकिस आला आहे.15 ऑगस्ट 2014 ला विजयनगर येथे महापालिकेचे रुग्णालय सुरु करण्यात आले. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. सर्वप्रकारचे उपचार मोफत करण्यात येत असल्यामुळे दररोज शेकडो रुग्णांच्या रांगा या रुग्णालयात दिसून येत होत्या. मात्र,सुरवातीचे काही महिने चांगल्या सुविधा दिल्यानंतर या रुग्णालयाचीच प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. अद्यावत सोयींनी सुसज्ज अशी या रुग्णालयाची जाहीरात करण्यात आली होती. मात्र,सीटीस्कॅन, एमआरआय,टुडी इको यासारख्या प्राथमिक सुविधाच या रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या महिन्यापासून तर एक्स-रे फिल्मच अस्तित्वात नसल्यामुळे रुग्णांना मोबाईलमध्ये एक्स-रेची कॉपी देण्यात येत आहे. या प्रकार कळल्यावर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे यांनी विशाल गुप्ता, शशीकांत मोरे, दीपक शेडगे यांच्यासह या हॉस्पीटलमध्ये जावून माहिती घेतली. त्यावेळी या हॉस्पटीलमधील अनेक समस्या समोर आल्या. डॉक्टरांची कमरतरता, हंगामी डॉक्टरांवर विसंबून असलेला कारभार, ठेक्यावर काम करणार्‍या नर्स, वॉर्डबॉय आणि आयाबाई यांच्याकडून कर्तव्यात होणारी कसर त्यांना दिसून आली.

त्यामुळे वाघमारे यांनी तात्काळ पालिकेच्या अतीरिक्त आयुक्तांची भेट घेवून, कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. माहिती घेवून या हॉस्पीटलमधील कमतरता त्वरीत दुर करण्यात येतील.असे आश्वासन अतीरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिले.

First Published on: October 22, 2018 1:21 AM
Exit mobile version