योगा क्लास सोडला म्हणून शिक्षकाने केला विनयभंग

योगा क्लास सोडला म्हणून शिक्षकाने केला विनयभंग

योगा क्लास सोडला म्हणून एका शिक्षकाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. मुंबई पोलिसांनी या योगा शिक्षकाला अटक केली आहे. या योगा शिक्षकाचे नाव राजू घोष (वय-२२) असे आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मुंबईच्या उच्चभ्रू भागामध्ये म्हणजे पाली हिल या भागात घडला आहे.

काय आहे नमकं प्रकरण?

महिलेने केलेल्या आरोपानुसार राजू घोष हा महिलेची वारंवार छेड काढत होता. ही महिला राजूच्या क्लासमध्ये शिकायला जात होती. काही दिवसांनंतर या महिलेने योगा क्लासला जाणं बंद केलं आणि दुसऱ्या क्लासमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ही बाब राजूला कळल्यावर तो भडकला. त्याने पीडित महिलेचा पाठलाग करायला सुरुवात केली. राजूने महिलेला छळण्याचा प्रयत्न केला. ‘तू तुझ्या नवऱ्याला सोड आणि माझ्यासोबत राहा’, असं राजू पीडितेला सांगत होता. ‘तुझ्या शारीरीक व्याधी मी योगाने बऱ्या करतो’, असंही तो पीडित महिलेला म्हणाला. त्याच्या त्रासाला वैतागून अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी राजूला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने राजूला जामीन मंजूर केला आहे.

ही विकृती अत्यंत लाजिरवाणी

शरीर सुदृढ राहण्यासाठी योगा करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे बरेच लोक योगा करतात. काही ठिकाणी योगाचे क्लासेस आहेत. या क्लासेसमध्ये योगाच्या शिक्षणासाठी भरपूर लोक जातात. परंतु, अशाच एका योगा क्लासेसच्या शिक्षकाने महिलेवर विनयभंग केला आहे. या योगा शिक्षकाचे नाव राजू घोष असे आहे. राजू घोषच्या अशा विकृत वागणुकीमुळे इतर योगा क्लासेसचेही नाव खराब झाले आहे. योगासन शिकवणाऱ्या पुरुष वर्गाच्या चरित्रावर प्रश्न निर्माण करणारे आहे.

First Published on: March 15, 2019 5:02 PM
Exit mobile version