खारमध्ये ५०० चौरस मीटर जागेवर होणार इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

खारमध्ये ५०० चौरस मीटर जागेवर होणार इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

खारघरमध्ये सिडकोने वायएमसीएला दिलेल्या ५०० चौरस मीटर जागेवर बहुउद्देशीय इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये तिरंदाजी आणि रायफल शूटिग या साहसी खेळांसह विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या संकुलात क्लायमिंगसाठी ३० फुटाची भिंत देखील बांधण्यात येणार आहे. संकुलात उभारण्यासठी साधारण ३.५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच २०२३ पर्यंत या संकुलाचे काम पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मध्यमवर्गीयांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे या संकुल उभारणीचे उद्दिष्ट आहे.
क्रीडा संकुल उभारणीबाबत वायएमसीएचे सरचिटणीस पॉल जॉर्ज यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, तरुणांमध्ये चांगले आरोग्य आणि फिटनेस वाढवणे तसेच समाजाच्या सर्व स्तरांतील कुटुंबांची सेवा करणे हा आमचा उद्देश आहे. त्यांचे शरीर आणि मन सुदृढ ठेवून आम्ही त्यांना निरोगी जीवनशैली जगण्यास मदत करू इच्छितो. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्पर्धात्मक खेळांमध्ये आशादायक खेळाडूंना प्रशिक्षित करू. त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आमच्याकडे व्यावसायिक परदेशी प्रशिक्षक असतील.

निसर्गरम्य खारघर टेकड्यांसह शिल्प व्हॅली प्रकल्पाजवळ सेक्टर ३६ मधील भूखंड क्रमांक ११ वर हे संकुल उभारण्यात येणार आहे. सामान्य लोकांसाठी हा एक विस्तृत पर्याय असेल. येथे जिम्नॅस्टिक्स, योग, नृत्य आणि तंदुरुस्ती, एरोबिक्स आणि झुम्बा, टेबल टेनिस, तिरंदाजी, रायफल नेमबाजी, कॅरम, बुद्धिबळ, मार्शल आर्ट्स, रिंक फुटबॉल, वजन उचलणे, शरीर सौष्ठव नेट टर्फ क्रिकेट, रॉक क्लाइंबिंग, रॅपेलिंग आणि बोल्डरिंग इत्यांदी इनडोअर खेळांची सुविधा उपलब्धे केली जाणार आहे.

क्रीडा मंत्रालयाशी संलग्न असलेल्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षणातील अल्प आणि दीर्घकालीन प्रमाणपत्र डिप्लोमा अभ्यासक्रमांसह क्रीडा प्रशिक्षण सुविधा याशिवाय यात आधुनिक फिटनेस सेंटर असेल. दरम्यान, आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धादेखील आयोजित करू. आमचे अंतिम ध्येय पुढील काही वर्षांत ऑलिम्पियन तयार करणे आहे, असेही जॉर्ज यांनी नमूद केले. नफा-तोट्याच्या आधारावर कॉम्प्लेक्स चालवण्यासाठी नाममात्र प्रशिक्षण शुल्क आकारले जाईल. क्रीडा संकुल पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील प्रदान करेल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास SC चा नकार

First Published on: August 18, 2021 8:21 PM
Exit mobile version