‘पार्कींग’साठी वाहन चालकांची अडवणूक;  पनवेल स्थानकानजिक शुल्क आकारणीसाठी मनमानी

‘पार्कींग’साठी वाहन चालकांची अडवणूक;  पनवेल स्थानकानजिक शुल्क आकारणीसाठी मनमानी

दीपक घरत: पनवेल
रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळानवर वाहन उभी करण्यासाठी मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी करण्यात येत असल्याने पनवेल रेल्वे स्थानकातून नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून रेल्वे स्थानक परिसरात सुरु असलेल्या या कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल रेल्वे स्थानकातून हार्बर रेल्वे मार्गे प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई तसेच ठाणे परिसरात नोकरीसाठी जाणार्‍या नोकरदारांची संख्या मोठी आहे. शहरालगतच्या वसाहतींमध्ये वास्तव्यास असल्याने या रेल्वे स्थानकापर्यंतचा प्रवास आपल्या खासगी दुचाकी, चारचाकी वाहनाने करण्यास नोकरदार पसंती देत असल्याने रेल्वे स्थानक परिसरातील वाहन तळ कमी पडू लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. याचाच फायदा रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध करून देण्यात आलेले वाहन तळ चालक उचलताना दिसत आहेत.
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सिडको च्या माध्यमातून नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून सिडकोच्या भूखंडा वरील वाहन तळावर शुल्क वसुली केली जात आहे. तर मध्य रेल्वे कडून रेल्वेच्या मालकीच्या दोन भूखंडावरील वाहन तळावर वेगवेगळ्या ठेकेदाराच्या माध्यमातून शुल्क वसुली करण्यात येत आहे.महत्वाचे म्हणजे रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या या तिन्ही वाहनतळावर वेगवेगळ्या दराने शुल्क वसुली करण्यात येत असून,सिडकोच्या भूखंडावर ८ तासाकरता १० रुपये, रेल्वेच्या मालकीच्या भूखंडावरील वाहनतळावर एका ठिकाणी ८ तासाकरिता २० तर दुसर्‍या भूखंडावर ३० रुपये दर आकरणी केली जात आल्याने नियमित प्रवास करणारे प्रवसी संताप व्यक्त करत आहेत.

कंत्रादारामध्ये साठेलोटे असल्याचा संशय
पनवेलच्या दिशेने रेल्वे स्थानकात प्रवेश करताना सुरवातीला सिडकोचे वाहन तळ लागत असल्याने अनेक वाहन चालक सिडको च्या वाहन तळावर वाहन उभी करण्यास प्राथमिकता देतात. मात्र वाहन तळ फुल्ल झाल्याचे कारण देत सिडकोच्या या वाहन तळाचे दरवाजे सकाळीच बंद केले जात असल्याने वाहन चालक नाईलाजाने आपला मोर्चा रेल्वेच्या वाहन तलाकडे वळवतात. या वेळी पहिल्या ठिकाणी २०रुपये दर आकारणी केली जाते, मात्र हे देखील वाहन तळ फुल्ल होत असल्याने नाईलाज झालेल्या दुचाकी चालकाकडून ३० रुपये दर आकरणी केली जात असल्याने रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळ सांभाळणारे ठेकेदार आपापसात संगन मत करून वाहन चालकांना लुटत आहेत असा संशय व्यक्तकेला जात आहे.

रेल्वे स्थानक परिसरात उपलब्ध असलेले वाहन तळ अपुरे पडत आहेत. याचाच फायदा वाहन तळ सांभाळणारे उचलत असून,मनमर्जी पद्धतीने शुल्क आकरणी करत आहेत.
– शुभम पोळ. प्रवासी.
====================

First Published on: January 19, 2023 10:21 PM
Exit mobile version