एक हात मदतीचा संस्थेचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा

वैश्यवाणी- एक हात मदतीचा या संस्थेतर्फे पनवेल येथील वैश्य समाज हॉल येथे आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. या समारंभात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले.

वैश्यवाणी -एक हात मदतीचा ही संस्था समाजातील गरीब, गरजू, नागरिकांसाठी काम करणार आहे. या संस्थेतर्फे आयोजित हळदी कुंकू समारंभात रायगड जिल्हा, वैश्य समाज अध्यक्षा श्यामल आंग्रे, पनवेल वैश्य समाज महिला अध्यक्षा दीपिका फक्के, कळंबोली, महिला समाज अध्यक्षा माधवी चौधरी, कार्यक्रम अध्यक्षा विशाखा कापडी, पनवेल तालुका वैश्य समाज अध्यक्ष सुनील शेट्ये, कळंबोली वैश्य समाज अध्यक्ष अशोक साखरे, प्रदीप (बापू) दलाल (अध्यक्ष), दत्तात्रेय तांबोळी, विजय आंग्रे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले. तर कार्यक्रमात करन रजानी याने रंगत आणली. या वेळी महिलांना वाण म्हणून तुळशीचे रोपटे देण्यात आले. यावेळी संस्थेच्या आगामी कार्याविषयी माहिती देण्यात आली.

पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारा वैश्यवाणी समाज हा विखुरलेला असून एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या हळदी कुंकू समारंभा दरम्यान सांगण्यात आले. समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमा दरम्यान राजेंद्र चौधरी याना जिल्हा परिषद औरंगाबाद येथे मिळालेल्या पुरस्काराबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश तांबोळी, उपाध्यक्ष हर्षला तांबोळी, सचिव मयूर तांबडे, सहसचिव अंकिता आंग्रे, खजिनदार विजय तांबोळी, सहखजिनदार विवेक कापडी, दर्शन तांबडे, समीर तांबोळी, जयेंद्र शेट्ये पंकज तांबडे आणि सर्व सभासद आदींनी मेहनत घेतली.

First Published on: February 10, 2021 4:07 PM
Exit mobile version