राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी केला अमृता फडणवीसांचा आक्षेपार्ह उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गावडे

भाजप विरोधातील राजकीय वादात अमृता फडणवीस या मुलाखतीद्वारे तसेच सोशल मीडियावरून आपलं मत मांडून चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. अशातच नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केळेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना नवी मुंबईतीळ महाविकास आघाडीच्या विविध मुख्य पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे यांची देखील भाषणे झाली.

अशोक गावडे तुम्ही अमृता फडणवीस यांची माफी मागितली नाही, तर नवी मुंबईतील आम्ही सर्व महिला तुम्हाला शहरात फिरु देणार नाही. महिलांना काय पण बोलाल, हे सहन केले जाणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत नवी मुंबईतील जनता तुम्हाला तुमची योग्य ती जागा दाखवून देईल. लवकर माफी मागा नाही तर मंदा म्हात्रे स्टाईलने उत्तर मिळेल.
– मंदा म्हात्रे, आमदार

मात्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे भाषण करत असताना आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पद्धतीने कोठेही टीका करत नाही. परंतु डान्सबारमधली ही मात्र रस्त्यावर येऊन बोलते, असे बेताल वक्तव्य केले. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकार्‍यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे यांनी अशोक गावडे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत माफी मागण्यास सांगितले आहे. त्यांनी आक्रमक होत महिलांसाठी केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखाबाबत गावडे यांना खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा –

Space Station भारतावर पाडायचे की चीनवर?; रशियन स्पेस एजन्सीची थेट अमेरिकेला धमकी

First Published on: February 25, 2022 9:24 PM
Exit mobile version