एपीएमसी बाजारात हिरवी मिरची कडाडली; दरात तीस रुपयांची वाढ

एपीएमसी बाजारात हिरवी मिरची कडाडली; दरात तीस रुपयांची वाढ

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मिरचीसह भाजीपाला मालाच्या ५५२ गाडी आवक झाली असून हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. आता मसाल्यांपाठोपाठ हिरवी मिरची कडाडली असून ज्वाला मिरची ६० ते ८० तर लवंगी मिरची ४० ते ६५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्याने संबंधित दरवाढ झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
अवकाळी पावसाने मिरचीचे कमी उत्पादन झाले असून सध्या पडत असलेल्या धुक्यामुळे अनेक रोगांनी मिरची पिकाला घेरले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून पुढेही मिरचीचा तुटवडा भासणार, असे दिसत आहे. सध्या महागाईने डोके वर काढल्याचे दिसून येत असून तेल आणि मसाल्यापाठोपाठ दैनंदिन जेवणात वापरली जाणारी मिरची तडकल्याने सामान्यांचे हाल होणार आहेत. शिवाय घाऊक बाजारात ४० ते ८० रुपये किलो असलेली मिरची किरकोळ बाजारात मात्र १२० ते १५० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी दिसत आहे. मिरची, आले आणि लिंबडा हा प्रतिदिन जेवणात वापरला जाणारा मसालाच महागल्याने सामन्यांचे बजेट बिघडले आहे.

कांदा घेत असाल तर सावधान

एपीएमसीत विकला जाणारा कांदा आरोग्याला हानिकारक झाला आहे. हा कांदा पूर्णपणे सडला असून कांद्यावर किड्यांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हाच कांदा हॉटेल, जेल आणि ग्राहकांना विकला जात आहे. त्यामुळे येथील व्यापार्‍याने हा कांदा उन्हात सुकायला ठेवला असून हा खराब झालेला कांदाच तुम्हाला विकला जाणार आहे. शिवाय पुरवठा करण्याच्या बहाण्याने हा कांदा, कांदा-बटाटा मार्केटमधून भाजीपाला बाजारात आणला जातो. मात्र भाजीपाला मार्केटमधील प्रत्येक पाकळीमध्ये कांदा, बटाटा आणि लसणाचा अवैध व्यापार केला जात आहे. परंतू हा सडलेला आणि दर्जाहीन कांदा विकून हे व्यापारी लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.

हेही वाचा – 

BJP 12 mla suspension revoked : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन अखेर मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

First Published on: February 11, 2022 9:20 PM
Exit mobile version