कळंबोलीतील वाहतूक रविवारी बंद; पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर कोंडीची शक्यता

कळंबोलीतील वाहतूक रविवारी बंद; पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर कोंडीची शक्यता

पनवेल: मुंबई – पुणे द्रूतगती महामार्गांवर कळंबोली गावा जवळ ओव्हर हेड गॅन्टी उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला असून रविवारी, १२ फेब्रुवारीस हे काम केले जाणार आहे. या मुळे कळंबोली गावाजवळील पट्ट्यातील वाहतूक दुपारी १२ ते दुपार वाहतूक ३ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, या पट्ट्यातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कळंबोली गाव – पनवेल सर्कल – देवांश ईन हॉटेल मार्गे पनवेल रॅम्पकडून द्रुतगती मार्गाने पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील कालावधीत दिलेल्या पर्यायी मार्गाचा उपयोग करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान द्रुतगती मार्गावर वाहनचालकांना अडचण आल्यास मोबाइल क्रमांक ९८२२४९८२२४ वरून नियंत्रण कक्षाशी किंवा मोबाइल क्रमांक ९८३३४९८३३४ वरून महामार्ग पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
मुंबई – पुणे द्रूत गती महामार्गांवर कळंबोली गावा जवळ ओव्हर हेड गॅन्टी उभारण्याच्या कामामुळे कळंबोलीतील वाहतूक बंद ठेवण्यात येणर असल्याने कळंबोली सर्कलजवळ कोंडीची समस्या निर्माण होण्याच शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रविवार असल्याने या मार्गावरुन एरवी पुण्याकडे जाणार्‍या वाहन संख्येत वाढ होत असते. रविवारी मात्र अशा वाहनचालकांना कळंबोलीतील वाहतूक बंदचा फटका वाहनकोंडी रुपात बसण्याची शक्यता आहे.

First Published on: February 11, 2023 9:19 PM
Exit mobile version