लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही…

लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही…

 

 

नवी मुंबई: जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन, अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या उद्देशाने सोमवारी कोकण भवनमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. विभागीय महसूल कार्यालयाच्या बैठक सभागृहात सकाळी ११ वाजता उपायुक्त(सामान्य) मनोज रानडे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी उपायुक्त(विकास) गिरीश भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) राजलक्ष्मी येरपुडे आदी उपस्थित होते.
‘भ्रष्टाचारमूक्त भारत-विकसित भारत’ (ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली. यावेळी गिरीश भालेराव यांनी यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त जनतेला दिलेल्या संदेशाचे वाचन केले. याप्रसंगी कोकण भवनमधील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन
दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात येते, त्या सप्ताहात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढनिश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या २०२२ या वर्षी केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत या ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

First Published on: October 31, 2022 9:35 PM
Exit mobile version