Navratri 2021 : ९ दिवस उपवास करुनही रहा फीट अँड फाईन; ऋजुता दिवेकरचा डाएट प्लान

Navratri 2021 : ९ दिवस उपवास करुनही रहा फीट अँड फाईन; ऋजुता दिवेकरचा डाएट प्लान

Navratri 2021 : ९ दिवस उपवास करुनही रहा 'फीट अँड फाईन', ऋजुता दिवेकरचा डाएट प्लान

नवरात्रौत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व बाजरपेठांमध्ये विविध सजावटीचे साहित्य, फुल-फळं, उपवासाचे पदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहयला मिळतेय. नवरात्रीत एक व्रत म्हणून भारतभर भक्तिभावाने उपवास करतात. पण धावपळीच्या जीवनशैलीत उपवासामुळे अनेकदा आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागतो. उपवासामुळे अनेकदा चक्कर येणे, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे पोटात दुखणे, गरगरणे अशा आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. मात्र व्यवस्थित डाएट प्लान फॉलो करत उपवास केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल. त्य़ामुळे ९ दिवस उपवास करुनही तुम्हाला ‘फीट अँड फाईन’ राहायचे असल्यास सेलिब्रिटी डाएटिशिअन ऋजुता दिवेकर यांचा डाएट प्लान नक्की फॉलो करु शकता. कारण ऋजुता दिवेकर यांच्या मते, नवरात्रीचे विविध प्रकारचे पदार्थ विविध पोषक तत्वांनी समृद्ध असतात. जे महिलांना केवळ शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवत नाही तर हार्मोनलची पातळी संतुलन ठेवण्यास मदत करतात.

*९ दिवस उपवासादरम्यान हे पदार्थ खाऊन रहा ‘फीट अँड फाईन’*

१) ड्राय फ्रूट्स, दूध आणि पनीर

नवरात्रीच्या दिवसात या सर्व पदार्थांचा वापर जास्त करावा. कारण या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात.

२) बटाट्याची खीर, रताळ्याची खिचडी, साबुदाणा खिचडी

बटाटा आणि रताळ्यासारख्या भाज्यांमुळे शरीरास मोठ्याप्रमाणात ऊर्जा मिळते. तसेच हे पदार्थ शरीरातील पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात.

३) राजगीऱ्याची चपाती 

राजगीरामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरातील फायबर, फायटोस्टेरॉल, तेलाचे प्रमाण आणि उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते. याशिवाय कोलेस्ट्रॉल आणि पोटातील जळजळ कमी होऊ शकते.

४) शिंगाड्याच्या पीठाची चपाती

शिंगाड्याच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी, ई, पोटॅशियम, जस्तचे प्रमाण भरपूर असते. तसेच बहुतेक लोक या पिठापासून पुरी आणि पकोडे बनवतात.

५) कुटूची करी

कुटूची करी ही अतिशय चवदार आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. यात डिटॉक्सिफाइंग गुणधर्म असतात त्यामुळे प्रजनन क्षमता सुधारते.

६) वरीचा पुलाव

नवरात्रीदरम्यान ज्यांना उपवासाला वरीचे तांदूळ आवडत असतील तर उपवासाच्या दिवशी भातासारखे खाऊ शकता. त्यासोबत उपवासाची बटाट्याची भाजीही खाऊ शकता. वरीच्या तांदळातही जीवनसत्त्वे, खनिजे व तंतूमय पदार्थ आहेत.

७) केळ्य़ाचे पीठ

नवरात्रीसाठी कच्चे केळी आणि पिकलेली केळी दोन्ही विविध पदार्थांचा वापर करत विविध पदार्थ तयार करु शकता. तुम्ही ते वाफवून, तळून, उकळून किंवा अगदी मॅश करूनही खाऊ शकता. यात भरपूर फायबर असते. पचनासंबंधीत गंभीर समस्या असलेल्यांसाठी हे उत्तम आहेत.

८) मखाना

नवरात्रीच्या दरम्यान मखाना खीर खाणे अधिक फायदेशीर आहे. मखाना हे असं सुपरहूड आहे. ज्यामध्ये कॅलरीजची मात्रा अधिक आहे. मखानामध्ये पोषक तत्वे सर्वाधिक आहेत. मखानामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात म्हणजेच फॉक्स नट आणि ते किडनीसह तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही मखाना फायदेशीर मानला जातो. ते खाल्ल्याने शारीरिक कमजोरी दूर होते आणि शरीरात ऊर्जा येते.

९) शिकंजी आणि लस्सी

या दोन्ही कोल्डड्रिक्समध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतात. त्यासोबत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.


First Published on: October 6, 2021 2:49 PM
Exit mobile version