Navratri 2021: ‘म्हणून’ यंदा नवरात्र आठच दिवसांची

Navratri 2021: ‘म्हणून’ यंदा नवरात्र आठच दिवसांची

Navratri 2021: 'म्हणून' यंदा नवरात्र आठच दिवसांची

शारदीय नवरात्रौत्सवाला (Navratri 2021) सुरुवात झाली आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर देवीची पहिली माळ चढवण्यात आली. घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा साजरा केला जातो. मात्र यंदाचा नवरात्रौत्सव केवळ आठ दिवसांचाच आहे. यंदा आठव्या दिवशी दसरा आहे. नवरात्रौत्सव आठ दिवसांचा कसा काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यामागचे कारण असे की चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाली आहे. त्यामुळे या वर्षी देवीला आठ माळाच अर्पण केल्या जातील,असे पंचांग तज्ञ दा.कृ.सोमण यांनी सांगितले आहे. (Navratri 2021 This year Navratri only for eight days)

यंदाचा शारदीय नवरात्रौत्सव गुरुवारी म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून सुरू होऊन आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १४ ऑक्टोबरला महानवमी साजरी करुन १५ ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. यंदा गुरुवारी नवरात्री सुरू होऊन शुक्रवारी संपत आहे. नवरात्र उत्सवाचे सुरुवातीचे आणि शेवटचे वार हे शुभ असल्याचे म्हटले जात आहे.

यंदा तृतीया तिथी आणि चतुर्थी तिथी एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे चतुर्थीचा लोप झालाय त्यामुळे नवरात्र आठ दिवसांची आली आहे. तसेच तृतीया आणि चतुर्थी एकत्र आल्याने चंद्रघंटा आणि कुष्मांडा देवीच्या रुपांची पूजा देखील एकाच दिवशी केली जाणार आहे.

नवरात्र उत्सव २०२१: नऊ रंग कोणते?


हेही वाचा – Navratri 2021: नवरात्रीत उपवासाला काय खायचे आणि काय नाही?

First Published on: October 7, 2021 10:43 AM
Exit mobile version