पालघर जिल्हा परिषदेच्या १५ व पंचायत समितीच्या २९ जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी १४४ उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद गटातून ५० तर पंचायत समिती गणातून २१ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता जिल्हा परिषद गटात ७४ तर पंचायत समिती गणात ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तलासरी तालुक्यातील उधवा गटामध्ये ६ नामनिर्देशन पत्रांपैकी २ जणांनी माघार घेतल्याने ४ जण रिगणात राहिले. डहाणू तालुक्यातील बोर्डी गटामध्ये ३ जणांनी माघार घेतल्याने तीन जण रिंगणात आहेत. कासा गटातून दोघांनी माघार घेतल्याने चार जण रिंगणार राहिले आहेत. सरावली गटात एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने चार जण रिंगणात आहेत. वणई गटातून चार जणांनी माघार घेतली असून १० जण मैदानात राहिले आहेत.
विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गटातून चार जणांना माघार घेतली असून सात उमेदवार निवडणुक लढवत आहेत. मोखाडा तालुक्यातील आसे गटात ५ तर पोशेरा गटात ४ जण रिंगणात आहेत. वाडा तालुक्यातील गारगाव गटांत ५, मोज गटात ५ जण उरले आहेत. पालसई गटामध्ये ५, आबिटघरमध्ये ५ उमेदवार रिंगणात आहेत. पालघर तालुक्यातील सावरे ऐम्बुर गटात ५, नंडोरे गाटत ६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील डहाणू, वाडा, पालघर, वसई या चार तालुक्यातील पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. डहाणू तालुक्यातील पचायत समितीच्या ओसवीरा गणात २, सरावलीत ५ जण उमेदवार राहिले आहेत. वाडा पंचायत समितीच्या सापने बुद्रुक गणातून भाजपने उमेदवार मागे घेतल्याने ४ जण रिंगणात राहिले आहेत.
पालघर पंचायत समितीच्या नवापूर गणात ६, सालवड गणात ४, सरावली अवध नगर गणात ५ उमेदवार नशिब आजमावत आहेत. मान गणात सहा, शिगाव खुताड गणात ६, बराणपुर गणात ६, कोंढाण गणात ४, नवघर घाटीम गणात ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वसई पंचायत समितीच्या भाताणे गणात ५ आणि तिल्हेर गणात ६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
तालुका जि.प. जागा जि.प. उमेदवार पं.स. जागा पं.स. उमेदवार
वसई ० ०० ०२ १०
पालघर २ ११ ९ ४६
डहाणू ४ १८ ०२ १०
तलसारी १ ०४ ०० ००
वाडा ५ २६ ०१ ०४
विक्रमगड १ ०७ ०० ००
जव्हार ० ०० ०० ००
मोखाडा २ ०८ ०० ००
——– ——— ——- ——
१५ ७४ १४ ७०
हेही वाचा –
Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आर्थिक निकषात बदल