भुसावळ-बोईसर बस आणि ट्रकचा भीषण अपघात

भुसावळ-बोईसर बस आणि ट्रकचा भीषण अपघात

डहाणू: गुरुवार 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास डहाणू तालुक्यातील वधना वाणगाव राज्य मार्गावरील साखरे घाटात भुसावळ – बोईसर बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ह्यामध्ये बसमधील पंधरा प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भुसावळकडून बोईसर जाण्यासाठी निघालेल्या महामंडळाच्या प्रवासी बसला चारोटीकडे जाणार्‍या ट्रकची धडक बसून अपघात झाला आहे. अपघातामुळे बस चालक व बसमध्ये बेसावध बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांना ऐना आणि वाणगाव येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

बेसावध प्रवाशांपैकी काहींना दात, ओठ, चेहर्‍याला दुखापत झाली असून काहींना मुका मार लागल्याची माहिती मिळाली असून, ह्यातील 10 जणांना जास्त दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातग्रस्त ट्रक तत्काळ बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली आहे. तर बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बस ब्रेक डाऊन झाली असून त्यासाठी क्रेन ची व्यवस्था करण्यात येत आल्याची माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत कोळी यांनी दिली आहे.

First Published on: August 18, 2022 8:13 PM
Exit mobile version