पालघरमध्ये बेकायदा कॉल सेंटरवर कारवाई; चार जणांची टोळी गजाआड

पालघरमध्ये बेकायदा कॉल सेंटरवर कारवाई; चार जणांची टोळी गजाआड

वसईः पालघर मधील पाम या गावातील एका इमारतीत बेकायदा कॉल सेंटर चालवून कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळून फसवणुक करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सातपाटी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपाटी पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन करताना पाम गावातील वृंदावन सोसायटीमधील इमारत क्रमांक ८ मधील एका रुमवर छापेमारी केली. त्यावेळी बोगस कॉल सेंटर सुरु असल्याचे समोर आले. आंध्रप्रदेश मधील पामीरेड्डीपल्ली जिल्ह्यातील बालिजापल्ली गावातील चार तरुण हे बोगस कॉल सेंटर चालवत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी दोन लॅपटॉप, १४ मोबाईल, चार नोटबुक आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

हे ही वाचा –  संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांची डहाणूतील भूकंपग्रस्त भागाला भेट

बोगस कॉल सेंटरमधून ही टोळी इंडिया बुल्स फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांशी संपर्क साधत होते. इंडिया बुल्स कंझुमर फायनान्सचे बनावट कर्जाचे फॉर्म ग्राहकांना व्हॉटसअपवर पाठवून माहिती भरून घेत असत. त्यानंतर इंडिया बुल्स कंपनीच्या नावाचे बोगस लेटरपॅडवर ग्राहकांना कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले जात असे.

कर्ज घेण्यासाठी प्रोसेस फी, इन्शुरन्स, टीडीएस, जीएसटीच्या नावाखाली ग्राहकांकडून फोन पे, गुगल पेवरून पैसे घेऊन फसवणुक केली जात असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या टोळीने पालघरमधून आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील शेकडो ग्राहकांना गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

हे ही वाचा – मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाची कारवाई

First Published on: November 26, 2022 7:52 PM
Exit mobile version