Cyclone Tauktae: वादळामुळे पालघर वृक्षांचे नुकसान

Cyclone Tauktae: वादळामुळे पालघर वृक्षांचे नुकसान

चक्रीवादळामुळे १६ ते १८ मेपर्यंत पालघर शहरात जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात साठहून अधिक झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक ठिकाणी घरांवर, रस्त्यावर आणि वाहनांवरही झाडे पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली, मात्र जीवितहानी झालेली नाही. अरबी समुद्रातून अलिबाग, मुंबईच्या दिशेने आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा पालघरच्या वातावरणावर परिणाम दिसून आला. १५ मे रोजी रात्रीपासूनच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तसेच, जोरदार वारेही सुटले होते. सतत तीन दिवस पडणाऱ्या वाऱ्यासह पावसांमुळे शहराच्या मध्यवस्तीत आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे पडली होती.

पालघर शहरात ७०० पेक्षा जास्त झाडांची लागवड केली होती. तौक्ते चक्रीवादळांमुळे शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या जवळपास ६० झाडांचे नुकसान झाले आहे. पडलेल्या व नुकसानग्रस्त झाडांचे पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले असून दोन दिवसात काम पूर्ण करण्यात येईल. त्यापैकी एकही झाड आम्ही मरू देणार नाही. त्यासाठी जे काही करावें लागेल ते आम्ही नक्की करू.
– प्रितम राऊत, पर्यावरण प्रेमी

शहरात पडणाऱ्या झाडांपैकी जास्त संख्या पर्यावरण प्रेमीच्या सौजन्याने रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या झाडांची होती. शहरातील पर्यावरण प्रेमींनी खुप जतन करून हे झाडे वाढवली होती. त्यामुळे झाडें पडल्याने त्यांची मने दुखावली आहेत. पालघर शहरात मोठ्या प्रमाणावर ‘झाडे लावा झाडे जगवा’ ही मोहीम पर्यावरण प्रेमींच्यावतीने राबवण्यात आली होती. त्यात त्यांना यश आले होते. शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमुळे शहराला नवीन रूप देखील मिळाले होते. पण तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने तसेच सलग तीन दिवस जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसांमुळे त्या झाडांचे जबर नुकसान झाले आहे.

शहरात सुमारे सातशेपेक्षा जास्त झाडांची लागवड पर्यावरणप्रेमी प्रीतम राऊत व सहकाऱ्यांनी केली आहे. पालघर माहीम मुख्य रस्त्यावर २२०, फिलिया हॉस्पिटल जवळच्या परिसरात ७०, माहीम बायपास हायवेवर ९०, देवीसहाय रस्त्यावर १५, कचेरी रोडवर ३५, आर्यन शाळा परिसरात १०, आनंद आश्रम शाळा परिसरात ३५, रेणुका कॉम्प्लेक्स रस्त्यावर ३५, टेंभोडे रस्त्यावर २५, पालघर-सातपाटी मुख्य रस्त्यावर अल्याळी गावाजवळ ६० व इतर ठिकाणी जवळपास १५० झाडांची लागवड करण्यात आली होती.

हेही वाचा –

वृक्षप्राधिकरणात बदल करण्याचा संकल्प, महापौर मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

First Published on: May 21, 2021 4:46 PM
Exit mobile version