पहाटेच्या लोकलचा नोकरदारवर्गाला लेट मार्क

पहाटेच्या लोकलचा नोकरदारवर्गाला लेट मार्क

सफाळे: मुंबई -महानगरपालिका अंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका तसेच वसई-विरार महानगरपालिका येथे काम करणारा सफाई कामगार वर्ग हा बहूतांशी डहाणू ,पालघर, केळवेरोड,सफाळे येथील रहिवाशी असून दररोज पहाटेची लोकल ट्रेन पंधरा ते वीस मिनिटे उशीरा येत असल्याने कामावर वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे सफाई कामगार, इतर नोकरदार वर्ग वेळेवर कामावर पोहोचू शकत नसल्याने कामात लेट मार्क लागत असल्याने प्रवासी संतप्त आहेत.

सततच्या लेट मार्कमुळे नोकरी गमवण्याची शक्यता असून पहाटे डहाणूरोड वरून चार वाजता लोकल सुरू करण्याची मागणी केली जात आहे. डहाणू येथून सुटणारी पहाटे ४.४० ला चर्चगेट लोकल भाईंदर येथे जवळजवळ सकाळी ६.३० पर्यंत पोहचते. त्यामुळे रोजच कामावर वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे या कामगारांना आपली नोकरी गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत डहाणू येथून पहाटे ४ वाजता अतिरिक्त एक बोरीवलीपर्यंत तरी फेरी सुरू करण्यात यावी असे ह्या कामगार वर्गाकडून केली जात आहे.

मुंबईकडे जाणार्‍या गाड्या केळवेरोड व पालघर दरम्यान रेल्वेचे काम सुरू असल्याने गाड्या उशिरा येत असतात. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरळीत सुरू होईल.
– चुन्नीलाल अगलेसर, सफाळे रेल्वे व्यवस्थापक

First Published on: May 14, 2023 9:17 PM
Exit mobile version