खोडाळ्यात आदिवासींमध्ये कोविड लसीकरणाची भीती

खोडाळ्यात आदिवासींमध्ये कोविड लसीकरणाची भीती

Corona Vaccination : लसींच्या पुरवठ्यासाठी पालिका उत्पादक कंपन्यांकडे करतेय पाठपुरावा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून पहिल्या लाटेला वेशिवरच थोपवलेल्या ग्रामीण भागातील गावेच्या गावे कोरोनाची हॉटस्पॉट ठरत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व समूळ नायनाट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातील आदिवासी जनतेमध्ये कोरोनाने मृत्यूच्या घबराटीमुळे मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाला असून लसीकरण असलेल्या ठिकाणी नागरिक पाठ फिरवत आहेत.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती व शिक्षक यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी केली जाते. या आरोग्य सर्वेक्षणाद्वारे ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचा तपशील घेऊन त्याठिकाणी उपाययोजना केली जाते. मात्र, तपासणीच्या वेळी कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक तपासणी करत नसल्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागातील कोरोनाच्या विस्फोटाला आरोग्य विभागाने कंबर कसून सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आदिवासींच्या अज्ञान, गैरसमज व खोट्या अफवेमुळे आरोग्य विभागाने घेतलेल्या मोहिमेला प्रतिसाद मिळत नाही.

आरोग्य विभाकडून गावोगावी लसीकरण सत्राचे आयोजन करून लसीकरण केले जाते. मात्र, ग्रामीण, आदिवासी भागात लसीकरणाला मृत्यच्या अफवेने अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये कमालीची घबराट पसरली असून लस टोचून घेतल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो, असा मोठा गैरसमज पसरला आहे. याकरता ग्रामीण भागात खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ लोकांकडून व्यक्त केले जात आहे.

सद्यस्थितीत, ग्रामीण आदिवासी भागात नागरिकांमध्ये ताप, सर्दी, खोकला आदींचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. मात्र, अज्ञानाच्या व मृत्यूच्या भीतीपोटी नागरिक कोविड चाचणी करून घेत नाहीत. किंवा ऑक्सिजन लेव्हल, पल्स रेट आदींचे तपासणी करून घेत नाही. परिणामी, ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊन मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन तपासणीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. लसीकरणास अल्प प्रतिसाद लाभलेल्या गावांमध्ये जाऊन विचारणा केली असता, आदिवासींकडून आश्चर्यकारक उत्तरे दिली गेल्याचे आढळून येते. ‘मी लस घेतली नाही, आणि घेणार पण नाही. लस घेतल्याने कोरोना होतो. लसीने माणूस मरतो. त्यामुळे आम्ही लस घेणार नाही. आम्हाला वनस्पती औषध माहिती आहेत. त्यामुळे लस घेणार नसल्याचे स्पष्ट मत आदिवासी भागात उमटत आहे.

कोरोना चाचणी केल्यास आणि त्यात पॉझिटिव्ह आढळून आल्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले जाते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास मृत्यूदेह नातेवाईकांकडे न देता तिकडेच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे आपल्या परिवाराला आपले अंत्यदर्शन व अंत्यसंस्कार होत नसल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे दवाखान्यात जाऊन मरण्यापेक्षा आपल्या कुटुंबात मेलेलें बरे असल्याची भावना आदिवासींमध्ये निर्माण झाली आहे. तसेच लसीकरण असलेल्या गावांमध्ये आदिवासी बांधव लसीकरणाला न जाता शेतावर, माळावर घराची दरवाजे बंद करून जातात. त्यामुळे आरोग्य विभागाचा हिरमोड होतो आहे.

हेही वाचा –

सेंट्रल विस्टा, PM केअर फंड, मोफत लसीवरुन १२ विरोधी पक्षनेत्यांचे पंतप्रधान

First Published on: May 12, 2021 11:21 PM
Exit mobile version