पालिकेत नवीन सफाई यंत्राचे लोकार्पण

पालिकेत नवीन सफाई यंत्राचे लोकार्पण

भाईंदर :- मीरा- भाईंदर महापालिकेच्या सेवेत नवीन तंत्रज्ञान वापरून सफाई करण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड मोटर सक्शन मशीन गोब्ब्लर (सफाई यंत्र) यांचे उद्घाटन महापालिका मुख्य कार्यालयात आमदार गीता जैन व पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या शुभहस्ते पार पडले. आमदार जैन यांनी राज्य शासनाकडे मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत महापालिकेस बॅटरी ऑपरेटेड मोटर सक्शन मशीन गोब्ब्लर (सफाई यंत्र) खरेदी करण्यास २ कोटी ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याअनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून शहरातील एकूण सहा प्रभाग समित्यांना प्रत्येकी २ सफाई यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सकाळी सफाई कर्मचार्‍यांनी रस्त्यावरील, फुटपाथवरील कचरा स्वच्छ केल्यानंतर रस्त्यावर पुन्हा अस्वच्छता पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मीरा -भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छतेवर आणखी भर देण्याकरिता व सफाई कामगारांचा वारंवार सफाई करण्याचा ताण कमी करण्यासाठी सदर १२ सफाई यंत्रांचा पुरेपूर वापर केला जाणार असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले. या सफाई यंत्राच्या माध्यमातून काँक्रीट, गवत, लाकूड, प्लास्टिक, कागद आणि अ‍ॅल्युमिनियमचे तुकडे, काच तसेच इतर कचरा सहजतेने उचलण्यात येणार आहे. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, घनकचरा उपायुक्त रवी पवार, संजय शिंदे, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबीत, सिस्टम मॅनेजर तथा माहिती व जनसंपर्क अधिकारी राज घरत व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

First Published on: May 12, 2023 8:31 PM
Exit mobile version