मीरा- भाईंदरमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण

मीरा- भाईंदरमध्ये आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे लोकार्पण

भाईंदर :- शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.शिक्षणा सोबतच आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा करून आदिवासींना रोजगार देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. आदिवासींचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्या त्या ठिकाणी छोटे युनिट तयार करू आणि आदिवासींना त्या ठिकाणी रोजगार कसा मिळेल हे पाहू.आदिवासींचे शिक्षण व , स्थलांतर ह0 सोडवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे , असे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज मीरा रोड येथे सांगितले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याने तयार झालेल्या मीरा भाईंदर , मुन्शी कंपाउंड येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तत बोलत होते.
नूतन इमारतीचा उदघाटन सोहळा मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी वसतिगृह पूर्ण फिरून पाहिले. तसेच या वसतिगृहात फर्निचर, विदर्थ्यांच्या खोलीत स्टडी टेबल, बाथरूम मध्ये पूर्ण स्वछता व आरसे, शॉवर अशा सर्व सुविधा असाव्यात अशा बारकाईने सूचना मंत्र्यांनी केल्या. गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात हा लोकार्पण सोहळा झाला. सुरुवातीला आदिवासी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम , तारपा नृत्य व इतर नृत्य सादर करण्यात आले. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या सोहळ्यास उपस्थित होते.या कार्यक्रमाला मंत्री डॉ. विजयकुमार गावित , आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित , आमदार प्रताप सरनाईक , खासदार राजेंद्र गावित , आमदार गीता जैन, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

या वसतिगृहात तळ अधिक तीन मजले इमारतीचे ४९ हजार फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यात स्वयंपाकगृह , भोजन कक्ष , बहुउद्देशीय सभागृह , इन डोअर गेम्स खेळण्यासाठी हॉल , ७५ पेक्षा जास्त खोल्यांचा या इमारतीत समावेश आहे. त्यात एकाचवेळी ३३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वसतीगृहाचा लाभ घेता येईल. २० कोटींचा खर्च करून बांधण्यात आलेली वसतिगृह नूतन इमारत म्हणजे आदिवासी गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट ठरली आहे.

 

 

 

 

 

First Published on: December 6, 2022 9:40 PM
Exit mobile version