वाड्यात सुर्य खरबूजाची लागवड; प्रयोगशील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

वाड्यात सुर्य खरबूजाची लागवड; प्रयोगशील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका म्हणजे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. याच वाडा तालुक्यातील सांगे गावातील प्रयोगशील तरुण शेतकरी गौतम अनिल पाटील यांनी आपल्या शेतावर वेगवेगळे प्रयोग करत अनेक पिके घेतली. याच बरोबर वडील कृषीभूषण अनिल पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड सुरु केली. फळबाग लागवड करताना त्यांनी केळी, चिकू, पपई, केसर, आंबा अशा फळ रोपांची लागवड केली. एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी कलिंगड लागवडीमध्ये बाहेरून पिवळी कलिंगड लागवड केली. त्यानंतर आतून पिवळी कलिंगडाची लागवड केली. गेल्या ५ वर्षांपासून कलिंगडानंतर आपल्याकडे चांगले येणारे पिक म्हणून सुर्य खरबूज लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाला व त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले.

 

शेतीत सतत सुधारणा व नवीन तंत्रज्ञान वापरून शेती सोपी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पिकांच्या सततच्या बदलत्या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक असते.
– गौतम अनिल पाटील, प्रयोगशील शेतकरी, नाणे

खरबूज कलिंगड पिक खरेदी करताना एका महिला गृहिणीला सुर्य फळ (musk melon) ची मागणी केली असताना ते नदी किनारी होणारे पिक आपल्या जिल्ह्यात कोणी लावलेले दिसले नाही. हेच आव्हान समजून गौतम पाटील यांनी या पिक लागवड केली. त्यांना खुप छान पिक आले. हे पीक कोकणात उन्हाळ्यात खुप छान होते. विशेष म्हणजे बदलत्या हवामानात व रणरणत्या उन्हात हे पीक चांगले तग धरून आहे. प्रायोगिक तत्त्वावर अर्धा एकरात सुर्य खरबूजाची लागवड केली असून हे पीक ६० ते ७० दिवसांत तयार होते. यावर्षी फक्त अर्ध्या एकरावर त्याची लागवड केली असून सुमारे ५ ते ६ टन उत्पन्न मिळू शकेल, असे गौतम यांनी सांगितले. एक फळ साधारणपणे ८०० ग्राम ते दीड किलो वजनापर्यंत भरते. नोनोयू या कंपनीचे हे वाण आहे. या फळाला बिग बास्केटमध्ये मागणी आहे.

सुर्य खरबूजचे गुणधर्म –

हेही वाचा –

रवी राणा तळोजा कारागृहातून थेट नवनीत राणांच्या भेटीला, नवनीत राणांना अश्रू अनावर
First Published on: May 5, 2022 9:18 PM
Exit mobile version