बलात्कार करून खंडणीची मागणी

बलात्कार करून खंडणीची मागणी

वसईः भोजपुरी चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवतानाच लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पहात असलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरोधात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोजपुरी चित्रपटात अभिनेत्री बनवण्याचे स्वप्न पाहून मुंबईत आलेल्या एका २३ वर्षीय तरुणीची मनोज उर्फ टिल्लू गुप्ता याच्याशी ओळख झाली होती. मनोजने तिचा विश्वास संपादन करून तिला भोजपुरी चित्रपटात काम मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. त्यावेळची अश्लिल फोटो काढून ठेवले. गेली चार वर्षे मनोज पिडीत तरुणीचे शोषण करत होता. इतकेच नाही तर त्याच्यासोबतचे अश्लिल फोटो वायरल करण्याची धमकी देत मनोजने तिच्याकडे दहा लाख रुपयांची मागणीही केली. दुसरीकडे, मनोजची आई माधुरी गुप्ता, बहिण साधना गुप्ता आणि भाऊ प्रमोद गुप्ता तिला मारहाणही करत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या पिडीतेने तक्रार दिल्यानंतर नायगाव पोलिसांनी मनोजसह माधुरी, साधना, प्रमोदविरोधात बलात्कार आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: March 31, 2023 9:40 PM
Exit mobile version