पुरवठा, संजय गांधी विभाग बंदच; अपुऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फटका

पुरवठा, संजय गांधी विभाग बंदच; अपुऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फटका

१९९९ साली अस्तित्वात आलेल्या विक्रमगड तालुक्याच्या सरकारी विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामाचा ताण वाढला आहे. परिणामी पुरवठा आणि संजय गांधी विभाग अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत. १९९९ मध्ये अस्तित्वात आलेल्या विक्रमगड तालुक्याच्या तहसिल कार्यालयात मुलभूत सुविधेच्या अभावाबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रशासनावरही ताण पडत आहे. आजमितीस २३ वर्षांचा काळ लोटलोला आहे. तेव्हापासून तहसिल कार्यालय स्थापन झालेले आहे. आजही येथील अधिकारी व कर्मचारी यांना बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था झालेली नाही. सध्या हे कार्यालय अपुऱ्या जागेत पूर्वीच्या मंडळ अधिकारी कार्यालय भरवले जात असून नवीन इमारतीचा प्रस्ताव लालफितीत अडकलेला आहे. त्यामुळे अगोदच अपुरे कर्मचारी व योग्य त्या सुविधा नसल्याने पुरवठा व संजय गांधी विभागास मंजुरी नसल्याने अतिरिक्त काम करावे लागत असल्याने या कर्मचारी अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विक्रमगड तहसिल कार्यालयात पुरवठा विभाग, महसुल विभाग, संजय गांधी विभाग, एमआरजीएस विभाग, निवडणूक विभाग आदी विविध विभाग आहेत. गेल्या २३ वर्षांपासून या विभागातील महसुल विभाग सोडला. तर बाकी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकही पदे अद्यापपर्यंत मंजुरी केलेली नाहीत. त्यामुळे महसुल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून इतर विभागातील कामे करुन घ्यावी लागत आहेत. त्यामुळे आदिवासीबहूल गरीब लोकांची कामे वेळेत होत नाहीत. त्यांना वारंवार या कार्यालयाच्या खेटा माराव्या लागत आहेत. त्यामुळे वेळेबरोबर रोज येण्या जाण्यात पैशांचाही अपव्यय सहन करावा लागतो.

इतर तालुक्याच्या तुलनेत विक्रमगड तहसिल कार्यालयात कर्मचारीवर्ग फारच कमी प्रमाणात मंजुर करण्यात आलेला आहे. तालुक्याचे कामकाज हे इतर तालुक्याच्या प्रमाणात जास्त असल्याने कर्मचारीवर्ग त्याप्रमाणात मंजुर असणे आवश्यक आहे. त्यानुसार नव्याने सुधारीत कर्मचारीवर्ग मंजुर करणे आवश्यक आहे. यासंदर्भात शासनाला पत्रव्यवहार केला जात असूनही योग्य उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा विपरीत परिणाम तालुक्यातील विकासकामांवर होत आहे. त्यामुळे नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रिक्तपदांमुळे व अनेक पदे मंजुरीविना असल्याने अनेक विभागाअतंर्गत तालुक्यातील विकासकामांना खीळ बसली आहे. याचा तालुक्यावर विपरीत परिणाम होऊन सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पुरवठा विभाग          

पदे                                          रिक्त          

संजय गांधी विभाग  

पदे                           रिक्त

हेही वाचा –

कुत्रा भुंकतोय, भुंकू दे; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

First Published on: May 12, 2022 9:23 PM
Exit mobile version