नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर; जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधान करणार्‍या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात संतापलेल्या शिवसैनिकांनी पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करून राणेंविरोधातील संताप व्यक्त केला. नारायण राणे यांचे हे वक्तव्य गुन्ह्याच्या कक्षेत येत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यामागणीचे निवेदन नालासोपारा, तुळींज व माणिकपूर पोलीस ठाण्यात वसई शिवसेनेच्यावतीने देण्यात आले. संवैधानिक पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत बदनामी करणारी, द्वेषभावना भडकवणारी वक्तव्ये करून नारायण राणे समाजात शत्रुत्व निर्माण करत आहेत. त्यामुळे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी; अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने जे करायचे ते करेल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे. माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, वसई विधानसभा संघटक विनायक निकम, जिल्हा महिला संघटक किरण चेंदवणकर व युवानेता पंकज देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे निवेदन देण्यात आले आहे.

जव्हारच्या गांधी चौकात नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर शहरात युवासेनेच्या कार्यकर्यांनी निषेध मोटार सायकल रॅलीचे आयोजन करून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांनी राणे यांच्याविरोधात विविध घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, शहरप्रमुख परेश पटेल, उपतालुकाप्रमुख अनंता घोलप, अरशद कोतवाल, उपशहरप्रमुख साईनाथ नवले, विवेक मुर्तडक,नरेश महाले, युवा सेनेचे भूषण शिरसाठ,पियुष अहिरे आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

भाईंदर शहरात राणेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आहे. राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काशीमिरा व भाईंदर पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटक स्नेहल कंसालिया, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, राजू भोईर, शहरप्रमुख पप्पू भिसे, प्रशांत पालांडे, महिला उपशहर संघटक तेजस्विनी पाटील, गटनेत्या नीलम ढवण, नगरसेविका शर्मिला बगाजी, अनंत शिर्के, उपजिल्हासंघटक निशा नार्वेकर, सुप्रिया घोसाळकर, शहरसंघटक श्रेया साळवी, सुभाष केसरकर, जयराम मेसे, महेंश शिंदे, नरेंद्र उपरकर, प्रमोद सावंत, नागेश शिंदे, दीपक नाकडे, अरुण मांडरे, आकाश सिंह, गीता रॉय, निर्मला चव्हाण, अश्विनी चव्हाण, जावेद शेख, कमलाकर पाटील, बाळासाहेब बंडे, उमाशंकर यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सामिल झाले होते.

पालघर शहरातील हुतात्मा सतंभ चौकात शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकार्‍यांनी रस्त्यावर उतरून राणे यांच्या प्रतिमेला जोडे मोरो आंदोलन करण्यात आले. यावेळी राणे यांच्या पुतळ्याला काळे फासून त्याचे दहन करण्यात आले. तसेच राणे यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्तंभ चौक ते पालघर पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

हेही वाचा –

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक, संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल

First Published on: August 24, 2021 8:05 PM
Exit mobile version