महिलांना अश्लिल संदेश पाठवणारा इस्त्रीवाला गजाआड

महिलांना अश्लिल संदेश पाठवणारा इस्त्रीवाला गजाआड

Singapore Indian origin women jailed for 16 weeks in singapore accused of tourturing domestic helper

वसईः कपडे इस्त्रीसाठी आणलेल्या महिलांचे नंबर घेऊन व्हॉट्सअपवर अश्लिल संदेश टाकून महिलांशी गैरवर्तन करणार्‍या इस्त्रीवाल्याला पोलिसांनी अटक केली आहे. सोनू कनोजिया (३५) असे त्याचे नाव असून त्याला डोंबिवलीमधून अटक केली आहे. या आरोपीविरोधात विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विरार पूर्व परिसरातील एका तरुणीच्या मोबाईलवर कनोजिया याने मिसकॉल केला होता. त्यानंतर हा फोन मुलीचा असल्याचे लक्षात आल्यावर त्याने तिला त्याच व्हॉटसअपवर अश्लिल संदेश टाकण्यास सुरुवात केली.

आलेले संदेश तिने तात्काळ आपल्या वडिलांना दाखवले असता, वडिलांनी त्याला रिप्लाय दिला. यानंतरही त्यांनाही त्याने अश्लिल भाषेत शिवीगाळ करून, मला कोणीही पकडू शकत नाही, अशा धमक्या दिल्या. पीडित मुलीच्या वडिलांनी विरार पोलीस ठाण्यात काल रात्री तक्रार दाखल केली होती. विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेत गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना केले. अवघ्या २४ तासात आरोपीला डोंबिवली परिसरातून अटक करण्यात यश आले आहे. आरोपी हा एका इस्त्रीच्या दुकानात कामाला आहे. तो मूळचा उत्तरप्रदेशातील असून त्याची पत्नी आणि मुले गावी असतात. हा एकटाच इस्त्रीच्या दुकानात काम करून तिथेच राहत होता. दुकानात इस्त्रीसाठी कपडे घेऊन येणार्‍या महिलांचा मोबाईल नंबर घेऊन, त्या नंबरवर तो अश्लिल संदेश पाठवायचा. अनेक महिलांसोबत त्याने असेच प्रकार केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

First Published on: March 3, 2023 8:08 PM
Exit mobile version