महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या पतीचा विनापरवाना पाणी प्लांट

महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या पतीचा विनापरवाना पाणी प्लांट

महापौर ज्योत्स्ना हसनाळे

मिरा भाईंदर महापालिकेच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे उर्फ पूजा प्रताप शिंदे यांच्या पतीनेच आदिवासी जमिनीवर अनधिकृत बांधकामे करून त्याला महापालिकेकडून कर आकारणी केली आहे. त्यानंतर त्या जागी बेकायदा पाणी प्लांट सुरू करून त्याची विक्री सुरू केली आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या उपशहर प्रमुख रामभुवन वर्मा यांनी अनधिकृत बांधकाम आणि प्लांटवर कारवाई करून हसनाळे यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली आहे. महापालिका प्रभाग १४ मधील मौजे काशी, सर्व्हे क्रं. ५१, हिस्सा क्रं. २, शिंदेवाडी ही जमिन आदिवासींची असून महापौर ज्योत्स्ना हसनाळे उर्फ पूजा शिंदे यांचे पती प्रताप बळीराम शिंदे यांनी या जागेत अनधिकृतरित्या २ रूम, विटांचे कंपाउंड व वरती पत्रा शेड बांधली आहे. त्या ठिकाणी वॉटर प्लांट टाकून पाणी विक्रीचा धंदा सुरु केला आहे. या जागेमध्ये महापालिकेने कोणतीच बांधकाम परवानगी दिलेली नाही. तरी या मालमत्ता क्र. एन ०१००५१२४९००० अँड एन ०१००४६१५६००० कर आकारणी प्रताप शिंदे यांच्या नावाने झालेली आहे.

ही जमीन माझ्या पतीने २०१२ साली विकत घेतली आहे. त्या ठिकाणी कंपाऊंड बांधण्याची परवानगी आहे. त्या ठिकाणी माझे पती व्यवसाय करतात. त्याच्याशी माझा संबंध नाही. मी राजकारणात असले तरी पती राजकारणापासून दूर असतात.
– ज्योत्स्ना हसनाळे, महापौर

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत अनधिकृतबांधकाम करणाऱ्यांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. तसेच अनधिकृत बांधकामाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असलेल्यांचे नगरसेवकपद रद्द केले जाते. महापौरांच्या पतीने अनधिकृत बांधकाम करून मालमत्ता स्वतःच्या नावावर केली आहे. त्यामुळे याप्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. महापौरपदाचा गैरफायदा घेत पतीने अनधिकृत बांधकाम केल्याने हसनाळे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे. अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या शर्मा यांनी केल्या आहेत. वृद्धाश्रमाच्या नावाखाली दलित वस्ती सुधार योजनेतील २१ लाख रुपयांचा निधी शिंदेवाडी फार्महाऊस रस्ता सिमेंट काँक्रीटीकरणासाठी बेकायदेशीरपणे वापरण्यात आल्याचा प्रकारही उजेडात आला आहे.

हेही वाचा –

School Reopen : ठाण्यातील शाळा १५ डिसेंबरपासून : महापौर नरेश म्हस्के

First Published on: December 2, 2021 3:24 PM
Exit mobile version