जागोजागी भराव,शेतकर्‍यांनी काय करायंच राव?

जागोजागी भराव,शेतकर्‍यांनी काय करायंच राव?

सफाळे: पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील नावझे, गिराळे, साखरे, पारगाव, नवघर-घाटीम ग्रामपंचायत हद्दीत मुंबई- वडोदरा एक्सप्रेस वे काम दोन वर्षांपासून सुरू आहे.परंतु, जागोजागी भराव टाकल्याने शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या कामामुळे परिसरात नैसर्गिक नाले बंद झाल्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था न केल्याने शेतकर्‍यांचे शेतीचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे च्या कामाची सुरुवात करण्यात आली. जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपनीने हे काम घेतले आहे. या कामासाठी भराव टाकून काही ठिकाणी शेतकर्‍यांना विश्वासात न घेता नैसर्गिक नाले बंद करण्यात आले आहेत,असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला असलेल्या शेतीचे नुकसान होणार आहे.

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे काम अपूर्ण अवस्थेत असून कामामुळे भराव टाकल्याने नैसर्गिक नाले बंद होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतीचे नुकसान होऊन गावागावात पाणी जाण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने उपाययोजना करावी.
– सुनिल पाटील
माजी सरपंच, नगावे- गिराळे

First Published on: May 26, 2023 10:25 PM
Exit mobile version