यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही

विरार: आपण आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असून, यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, एकाकी आणि निराधार माता, भगिनींच्या अडीअडचणी सोडवून, त्यांच्या उत्कर्षांसाठी काम करणार असल्याची घोषणा वसई-विरार महापालिकेच्या माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी केली. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या एकसष्टीपूर्ती निमित्त डॉ. शिरीषकर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रविणा ठाकूर यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावेळी पुढे बोलताना ठाकूर यांनी आदिवासी, गोरगरीब, गरजवंतांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे ईश्वरी कार्य असून, त्यांच्या विविध गरजा आणि दुःखात सतत सहा वर्षे धावून जाणार्‍या डॉ. विजय शिरीषकर चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनंदन केले. माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, प्रकाश वनमाळी, नितीन राऊत, अनिलराज रोकडे, डॉ. प्रवीण क्षीरसागर, विलास चाफेकर यावेळी उपस्थित होते.

आमदार हितेंद्र ठाकूर एकसष्टीपूर्ती निमित्ताने स्थापन झालेल्या सर्वपक्षीय गौरव समितीतर्फे तालुकाभर विविध सामाजिक उपक्रमाने साजर्‍या होत असलेल्या सप्ताहाचा आढावा माजी महापौर नारायण मानकर यांनी आपल्या भाषणात घेऊन, डॉ. शिरीषकर ट्रस्टच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. प्रारंभी डॉ. शिरीषकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वृषाली वरूण शिरीषकर यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा आपल्या प्रस्ताविकात घेतला. माजी नगरसेवक संतोष वळवईकर, प्रवीण वर्तक, डॉ. वरूण शिरीषकर, प्रितेश पाटील, केवल वर्तक, श्रीकांत वेचलेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत घुमरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुरेश ठाकूर यांनी केले.आपण आता सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असून, यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, एकाकी आणि निराधार माता, भगिनींच्या अडीअडचणी सोडवून, त्यांच्या उत्कर्षांसाठी काम करणार असल्याची घोषणा वसई-विरार महापालिकेच्या माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर यांनी केली.
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या एकसष्टीपूर्ती निमित्त डॉ. शिरीषकर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रविणा ठाकूर यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावेळी पुढे बोलताना ठाकूर यांनी आदिवासी, गोरगरीब, गरजवंतांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे ईश्वरी कार्य असून, त्यांच्या विविध गरजा आणि दुःखात सतत सहा वर्षे धावून जाणार्‍या डॉ. विजय शिरीषकर चॅरिटेबल ट्रस्टचे अभिनंदन केले. माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, प्रकाश वनमाळी, नितीन राऊत, अनिलराज रोकडे, डॉ. प्रवीण क्षीरसागर, विलास चाफेकर यावेळी उपस्थित होते.

आमदार हितेंद्र ठाकूर एकसष्टीपूर्ती निमित्ताने स्थापन झालेल्या सर्वपक्षीय गौरव समितीतर्फे तालुकाभर विविध सामाजिक उपक्रमाने साजर्‍या होत असलेल्या सप्ताहाचा आढावा माजी महापौर नारायण मानकर यांनी आपल्या भाषणात घेऊन, डॉ. शिरीषकर ट्रस्टच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले. प्रारंभी डॉ. शिरीषकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वृषाली वरूण शिरीषकर यांनी ट्रस्टच्या कार्याचा आढावा आपल्या प्रस्ताविकात घेतला. माजी नगरसेवक संतोष वळवईकर, प्रवीण वर्तक, डॉ. वरूण शिरीषकर, प्रितेश पाटील, केवल वर्तक, श्रीकांत वेचलेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत घुमरे यांनी केले. तर आभारप्रदर्शन सुरेश ठाकूर यांनी केले.

First Published on: October 11, 2022 10:32 PM
Exit mobile version