अर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकांचे चक्रव्यूह तोडण्यास सरकार सज्ज

अर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकांचे चक्रव्यूह तोडण्यास सरकार सज्ज

विधिमंडळाच्या सन २०२३-२४ च्याअर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सुरुवात झाली. या अधिवेशनाकरिता विधानभवनात प्रांगणात आगमन करताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरांनीही अभिवादन केले.राज्यात आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने या न्यायालयीन संघर्षाच्या सावटाखाली आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात कांद्याचे घसरलेले दर, जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी दिलेली संपाची हाक, महागाई, बेरोजगारी, शेतकरी नुकसान भरपाई आदी मुद्दे गाजण्याची शक्यता आहे.

 

First Published on: February 27, 2023 12:37 PM
Exit mobile version