पनवेलच्या कुंभारवाडयात सजताहेत दहीहंडी

पनवेलच्या कुंभारवाडयात सजताहेत दहीहंडी

पनवेलच्या कुंभारवाडयात सजताहेत दहीहंडी

दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे दहीहंडी. कोरोनाच्या सावटामुळे सलग दोन वर्ष या सणाला सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दहीहंडीसाठी मडकी सजवणाऱ्या कुंभार समाजावरही उपासमारीची वेळ आली. या मडकी सजवणाऱ्यांच्या व्यवसायाचे सलग दोन वर्ष नुकसान झाले. यंदा मंगळवारी ३१ ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव आहे.घाऊक विक्रेता असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऑर्डर असते, त्यासाठी सतत फोन येत असतात. मात्र सलग दोन वर्ष फोन केला तरी ऑर्डर न मिळाल्यामुळे हंडी व्यवसायाला फटका बसला. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेने यावर्षी दहीहंड्याना मागणी आहे. गोपाळकाल्यासाठी आवश्यक असलेली पनवेल – उरण – पेण तालुक्यातील कुंभारवाड्यात सजवल्या जात आहेत.


हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात


 

 

First Published on: August 29, 2021 3:04 PM
Exit mobile version