Holi 2022 : कतरिना ते अंकिता लोखंडे, ‘हे’ कलाकार सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली होळी

Holi 2022 : कतरिना ते अंकिता लोखंडे,  ‘हे’ कलाकार सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली होळी

Holi 2022 : कतरिना ते अंकिता लोखंडे, 'हे' कलाकार सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली होळी

संपूर्ण देशात रंगाचा सण म्हणजेच होळी साजरी होत आहे. सर्वांवरच होळीचे रंग चढायला सुरुवात झाली आहे. सर्वत्र लाल गुलालात तल्लीन झालेले लोक पाहायला मिळत आहेत. होळीच्या सणाची लोक  वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाची होळी अनेक सेलिब्रेटींसाठीही खास असणार आहे. अनेक सेलिब्रेटी यंदा आपल्या लाईफ पार्टनर सोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणार आहे. कोण कोण आहेत सेलिब्रेटी चला पाहूया.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंड आज पती विक्की जैन सोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणार आहे. दोघांनी १४ डिसेंबरला लग्न केलं.

 


बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी १९ फेब्रुवारीला लग्न केलं. आज हे जोडप ही लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणार आहे.


नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉयने गोव्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केलं. लग्नानंतर दोघांची पहिली होळी आहे. दोघेही सध्या रोमँटिक स्टाईलमध्ये होळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत.

 

२०२१ वर्षाच्या शेवट ज्यांना गाजवला ते मोस्ट लव्हबेल कपल म्हणजे कतरिना कैफ आणि विक्की कौशल. हे नवविवाहित जोडपही यंदा लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणार आहे.

 


प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्ना देखील नुकतीच ५ फेब्रुवारीला वरुन बंगेरासोबत लग्नबंधानात अडकली. सध्या दोघेही वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत पहिली होळी साजरी करणार आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री दिशा परमान आणि राहूल वैद्य यांनी १६ जुलै २०२१मध्ये लग्न केलं. ही जोडी सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड झाली होती. आज हे दोघेही लग्नानंतरची पहिली होळी साजरी करणार आहेत.

फेअर एंड लव्हली गर्ल यामी गौमतने ४ जूनला हिमाचल प्रदेशमध्ये बॉयफ्रेंड आदित्य धर सोबत गुपचूप लग्न केलं. दोघेही सध्या त्यांच्या व्यावसायिक जीवनात व्यस्त आहेत पण तरीही एकत्र पहिली होळी साजरी करणार आहेत.


हेही वाचा –  Photo: रश्मी देसाई रंगली होळीच्या रंगात, पाहा कलरफुल फोटो

First Published on: March 17, 2022 3:09 PM
Exit mobile version