आयपीएलने दिले नवे चॅम्प्स

आयपीएलने दिले नवे चॅम्प्स

आयपीएलचे टॉप परफॉरमर्स

आयपीएलचा यंदाचा ११ वा हंगाम होता. पहिल्या हंगामापासून आयपीएलने अनेक नवे चेहरे भारतीय क्रिकेटला दिले होते.यात रवींद्र जडेजा, युसुफ पठाण, मनीष पांडे, रायडू, कुणाल पंड्या अशा खेळाडूंचा समावेश आहे. यंदाचा हंगाम देखील फार रोमांचक सुरु असून बरेच नवे चॅम्पियन्स आयपीएलने दिले आहेत. त्यातीलच काहींचा हा घेतलेला आढावा…

रिषभ पंत

१. रिषभ पंत

आपल्या धडाकेबाज कामगिरीने “भविष्यातील धोनी” असा किताब पटकावलेला रिषभ पंतची कामगिरी खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्याने दिल्लीकडून खेळत असताना १४ सामन्यात ६८४ धाव केल्या आहेत . तसेच १२८ हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. लिगमधील तळातले सामने संपेपर्यंत टॉप स्कोअररची ऑरेंज कॅप त्याच्या डोक्यावर आहे.

अंकित राजपूत

२. अंकित राजपूत

आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेल्या अंकित राजपूतने पंजाबकडून खेळत हैद्राबादसारख्या बलाढ्य संघाचे ५ गडी एकाच सामन्यात बाद केले आहेत. तर एकूण ११ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.

पृथ्वी शॉ

३. पृथ्वी शॉ

१८ वर्षीय मुंबईकर पृथ्वी शॉने केवळ ९ मॅचेस मध्ये २४५ धावा केल्या आहेत. ६५ रुन्सचा सर्वाधीक स्कोर गाठण्यात त्याला यश आल आहे. १५३ हा त्याचा स्ट्रायकिंग रेट असून त्याची या आयपील मधील कामगिरी खरच कमालीची आहे.

मयांक मार्कंडे

४. मयांक मार्कंडे

मुंबईकडून खेळलेला मराठमोळा मयांक हा चंदिगढला राहत असला तरी त्याने मुंबईकडून केलेली कामगिरी अप्रतिम आहे सुरुवातीच्या काही सामन्यातच त्याने आपली कमाल दाखवत हैद्राबाद संघाच्या ४ खेळाडूंना २३ रन देत बाद केलं होता. या आयपीएल मधील कामगिरीमुळे मयंकचे भारतीय संघात खेळण्याचे चान्स वाढले आहेत.

सिद्धार्थ कौल

५. सिद्धार्थ कौल

सिद्धार्थने हैद्राबाद कडून खेळताना १४ सामन्यात १७ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत अप्रतिम अशी कामगिरी केली आहे त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हैद्राबाद सर्वात वरच्या स्थानावर आहे. या नवख्या भारतीय खेळाडूने आपल्या कामगिरीने सर्वच क्रिकेटप्रेमींना खुश केले आहे.

कृष्णप्पा गौथम

६. कृष्णप्पा गौथम.

राजस्थान रॉयल्स कडून खेळताना आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने कृष्णप्पाने सर्वानाच अचंबित केले आहे. २०५ चा सर्वाधिक स्ट्राईक रेट कायम ठेवत कृष्णप्पाने आपल्या अष्टपैलू खेळाने आपले नवीन स्थान बनविले आहे.

श्रेयस गोपाल

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना श्रेयस गोपालने अत्यंत उत्तम अशी कामगिरी केली असून त्याने एका सामन्यात बेंगलोर विरोधात १६ रन देत ४ विकेट मिळविल्या होत्या. ७ चा उत्कृष्ट असा इकॉनॉमी असणारा श्रेयस हा भारतीय संघासाठी एक उत्तम बॉलर बनेल हे नक्की.

 

First Published on: May 21, 2018 11:22 AM
Exit mobile version