अंमली पदार्थांविषयी तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

अंमली पदार्थांविषयी तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

(फोटो सौजन्य : India Today)

सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या अधीन गेल्याचं अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. अंमली पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचे माहीत असून देखील आजकालची तरुण पिढी त्याचे सेवन करते. मात्र हे अंमली पदार्थ कोणते आहेत? त्यांच्या सेवनाने कोणते आजार होतात?

कोणते आहेत अंमली पदार्थ?

या पदार्थांचे सेवन केल्याने एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा आणि धुंदी येते त्यांना मादक पदार्थ किंवा अंमली पदार्थ म्हटले जाते. अफू, मॉर्फीन, हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, भांग, एलएसडी, पेफेडाईन, केटामाईन, कोडेन, पॉपी स्ट्रॉ इत्यादी अंमली पदार्थांचा समावेश होतो.

अंमली पदार्थांमुळे कोणते होतात आजार?

अंमली पदार्थांमुळे अनेक मोठ-मोठे आजार होतात. यामध्ये कर्करोग, घसा दुखणे, खोकला, कफ वाढणे, उच्च रक्तदाब, वंध्यत्व, अल्सर, लकवा, रक्तक्षय, पंडु, गर्भपात, फुप्फुसरोग इत्यादी आजार उद्भवतात.

यावर उपाय

अंमली पदार्थ्यांचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला त्याची मानसिकता जाणून घेऊन त्यांना प्रथम समजून सांगणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या अंमली पदार्थांमुळे कोणते आजार होतात याची जाणीव करुन द्यावी. त्याचबरोबर अंमली पदार्थांमुळे कोणते आजार होतात याची जनजागृती करावी.

First Published on: June 26, 2018 4:05 PM
Exit mobile version