रायगड जिल्ह्यात बहरतेय अद्भुत निसर्गाची समृद्ध जैवविधता

रायगड जिल्ह्यात बहरतेय अद्भुत निसर्गाची समृद्ध जैवविधता

रायगड जिल्ह्यात बहरतेय अद्भुत निसर्गाची समृद्ध जैवविधता

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्याला तब्बल २४० किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनार लाभला आहे. यासह समृद्ध निसर्ग व जैवविधता बहरली आहे. पश्चिम घाटाचा बराचसा भाग हा रायगड जिल्ह्यातून जातो. विशेष म्हणजे अनेक लुप्त होणाऱ्या प्राणी व वनस्पतींच्या प्रजातींसह राज्य फुल, राज्यपक्षी, राज्य प्राणी व राज्यफुलपाखरू यांचे वास्तव्य येथे पहायला मिळत आहे. त्यामुळे हा परिसर जैविविधतेसाठी नंदनवन ठरत आहे. परिणामी निसर्ग पर्यटनासाठी येथे हक्काचे आंदण आहे.अनेक प्राणीपक्षी व निसर्ग अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणावरून येथील जैवविविधतेचे विविध पैलू समोर आले आहेत. माणगाव विळे येथील पशुपक्षी व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी १० वर्षाहून अधिक काळ केलेला अभ्यास आणि निरीक्षणावरून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आणल्या आहेत. त्यांना येथे दुर्मिळ प्रजातीच्या विविध पक्षांचे दर्शन झाले आहे.विशेष म्हणजे औद्योगिकी कारणामध्ये देखील येथील जैवविविधता टिकून आहे.

 


हेही वाचा – केंद्रानं आरक्षणासाठीची ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटवली पाहिजे – शरद पवार


 

 

First Published on: August 16, 2021 6:14 PM
Exit mobile version