Photo : राष्ट्रवादीच्या आग्रही कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती…

Photo : राष्ट्रवादीच्या आग्रही कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंची हात जोडून विनंती…

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी (2 मे 2023) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. शरद पवारांनी असा निर्णय जाहीर करणे, हे सर्वांसाठी अनपेक्षित होते. त्यामुळे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी पवारांकडे केली. शरद पवारच पक्षाच्या अध्यक्षपदी हवेत, अशी आग्रही भूमिका या सर्वांनी घेतली. ते सर्व मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानबाहेर ठिय्या देऊन बसले आहेत.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांना पाहताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, या मागणीवर ठाम असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सुप्रिया सुळे यांनी हात जोडून त्यांची मनधरणी केली.

मात्र, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आग्रहीच भूमिका राहिल्याने अखेर शरद पवारांनी स्वत: तिथे येऊन तुमच्या भावनांचा आदर करून 1 ते 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

First Published on: May 4, 2023 3:42 PM
Exit mobile version