पावसाळ्यात असा असावा डाएट, सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट ऋजूता दिवेकरांचा सल्ला

पावसाळ्यात असा असावा डाएट, सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट ऋजूता दिवेकरांचा सल्ला

मान्सून ऋतुची सुरुवात झाली आहे. या चार महिन्यात अनेकदा वातावरणात बदल होऊ शकतात. काही वेळा दमदार पाऊस असतो किंवा उष्णाता मोठ्या प्रमाणात वाढते. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ‘रुजुता दिवाकर’ यांनी काही दिवसांपूर्वी इस्टाग्राम वर लाइव येऊन मान्सून डाइट संर्दभात महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. या मान्सून मध्ये कोणते पदार्थ खावे, काय खाऊ नये याची माहिती दिली. आणि त्याच बरोबर त्यांनी डायट कस असाव हे देखील शेअर केल.

काय खाऊ नये
बाहेरच खाणे टाळा, या वातावरणात जास्त प्रमाणात संसर्गजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. जिवजंतु, कीटाणु सर्वत्र पसरलेले असतात. घरगुती जेवण जेवा. पाणी उकळुन घ्या.

खाण्यात कोणते पदार्थ टाळावे
मांस, अंडी आणि मासे त्याच बरोबर कांदा, लसून यांचे सेवन कमी करावे.

डाइटमध्ये कोणत्या पदार्थांच सामावेश असावा
मांस, कांदे आणि लसूण यांचे सेवन कमी करण्याबरोबरच काही भाज्या आहेत, ज्या या हंगामात खाऊ नयेत. या वातावरणात राजगिरा, कुट्टू आणि कच्च्या केळ्याचे पीठ आपल्या डाइटमध्ये असावे. सूरन, कंदमुळ, शंकरकंद असा आहार करावा.

या ऋतुमध्ये एक विशेष ऋषिची भाजी मिळते. जी अनेक प्रकारे आरोग्य सुधारण्यास मदत करते. याशिवाय उकडलेले शेंगदाणे, कॉर्न, काकडी, भोपळा या भाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत.

 

 

 

 

 

 

First Published on: August 7, 2021 5:49 PM
Exit mobile version