Photo: अखेर राणी बागेचे दरवाजे पर्यटनासाठी उघडले

Photo: अखेर राणी बागेचे दरवाजे पर्यटनासाठी उघडले

Photo: अखेर राणी बागेचे दरवाजे पर्यटनासाठी उघडले

भायखळा येथील सुप्रसिद्ध असे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्राहलय सोमवार पासून पुन्हा एकदा पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे. दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सोमवार पासून राणी बाग पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे. राणी बाग सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहे. राणी बाग पर्यटनासाठी खुली होताच अनेक हौशी त्याचबरोबर प्रोझेशनल फोटोग्राफर्सनी हजेरी लावली होती. राणी बागेत पर्यटनासाठी जाताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्रिया आणि ५ वर्षाखालील मुलांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

 

First Published on: February 15, 2021 10:27 PM
Exit mobile version