सत्यपाल मलिकांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा कोश्यारींवर निशाणा म्हणाले…

सत्यपाल मलिकांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा कोश्यारींवर निशाणा म्हणाले…

मुंबई | “भगतसिंग कोश्यारींचे राजकारण सत्य मानले जाते”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार आणि राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची संजय राऊतांनी आज सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीनंतर संजय राऊतांनी माध्यमाशी बोलताना त्यांनी भगतसिंग कोश्यारीवर (Bhagat Singh Koshyari) टीका केली. सत्यापाल मलिक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती संजय राऊतांनी माध्यमांना दिली.

सत्यपाल मलिकांचे वक्तव्य केंद्र सरकार गांभीर्याने घेत नाही, असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “भगतसिंग कोश्यारीचे वक्तव्य गांभीर्याने घेतले जाते. आणि त्यांच्या कृत्याचे समर्थन केले जाते. कोश्यारींनी घेतलेले निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरले आहेत. तरी तुम्ही त्यांनी केलेले राजकारण सत्य मानता. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेले नेते त्यांनी घेतलेल्या भूमिका तुम्ही सत्य मानत नाही. कारण, सत्यपाल मलिकांच्या भूमिका या सरकार विरोधात आहेत. त्यांनी मांडलेले विषय समजून घेणे हे आमच्यासारख्या लोकांचे कर्तृव्य आहे. त्यावर चर्चा करणे हे आमचे काम आहे”, असे म्हणत त्यांनी कोश्यारींवर निशाणा साधला

भाजपाला कोणाला सुपाऱ्या द्यायच्या असतील तर…

तुम्हाला १३ मेनंतर कळेल..

शिंदे गटाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत आणि तुमचे काही आमदार त्यांच्या संपर्कात आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “हे येणार काळच ठरवेल, कोण खोटे आणि काय खरे आहे. तुम्हाला १३ मेनंतर दिसेल”, असे म्हणत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय लवकरच येईल, असे संकेत राऊतांनी यावेळी दिले आहे.

देशाच्या सध्याच्या आणि भविष्याच्या राजकारणावर चर्चा

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले, “सत्यपाल मलिक यांच्यासोबत भेटीची वेळी आधीच ठरलेली होती. देशातील सध्याचे आणि भविष्यातील राजकीय घडामोडींवर आम्ही एक दीड तास चर्चा केली. आणि उद्धव ठाकरेंनी देखील सत्यपाल मलिकांशी फोनवरून बोलले आहेत. ही एक सदीच्छा भेट होती.”

देशाला कोणातपासून धोका

“गेल्या काही दिवसांपासून सत्यपाल मलिकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे. सत्यपाल मलिकांनी राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात जी काही भूमिका घेत त्यांनी देशासमोर माहिती दिली आहे. आम्ही भेटीदरम्यान पुलवामा हल्ल्याची चर्चा केली. पुलवामा हल्ल्याचे परखड सत्य त्यांनी मांडले. यात सत्यपाल मलिकांनी दिलेल्या माहिती कितपद तथ्य आहे आणि काय पुरावे आहेत. देशाला कोणापासून धोका आहेत. भविष्यात देशात परिवर्तन हवे असेल तर आपण काय करावे. यात सत्यपाल मलिकांची भूमिका काय असेल. यासंदंर्भात आम्ही चर्चा केली आहे”, असे संजय राऊतांनी सांगितले.

सत्यपाल मलिकांना महाराष्ट्रात येणार

सत्यपाल मलिकांना मुंबई येण्याचे निमंत्रण दिले आहे का?, या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “सत्यपाल मलिकांना महाराष्ट्रात येणार आहे. सध्या ते हरियाणा, राजस्थान, बिहारचा दौऱ्यावर जाऊन आले आहेत.”

 

 

First Published on: April 27, 2023 3:23 PM
Exit mobile version