सभेनंतर राज ठाकरेंविरोधात पुण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण?

सभेनंतर राज ठाकरेंविरोधात पुण्यात तक्रार दाखल; काय आहे प्रकरण?

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी बुधवारी, 22 मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत जोरदार भाषण केले. अनेक मुद्द्यावरुन त्यांनी सत्ताधारी आणि उद्धव ठाकरेंना चांगलेच सुनावले. यावेळी राज ठाकरे यांनी खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. या दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला 1 महिन्यांचा कालावधी दिली. यावर लगेचच सरकारने कारवाई केल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे मात्र पुण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

का करण्यात आली तक्रार?

राज ठाकरे यांनी 22 मार्च रोजी केलेला भाषण हिंदू- मुस्लीम समाजात भांडण लावणारे आहे. त्यांच्या भाषणामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण हे केवळ एका समाजाच्या भावना दुखावणारे होते. रमजान महिन्यात केलेल्या या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच यापुढे त्यांना भाषणासाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी तक्रारदार बाजीद राजाक सय्यद यांनी वाकड  पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सभेत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी बुधवारी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात मजार बांधली गेल्याचा दावा केला होता. त्यानी ड्रोनद्वारे व्हिडीओही दाखवला होता. तसेच, राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारला या मजारीवर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदतही दिली होती. एका महिन्यात कारवाई केली नाही तर आम्हीही त्याबाजूला गणपतीचे मोठे मंदीर बांधू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यामुळे प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत अवघ्या 24 तासांत मजारीवर कारवाई केली आहे. राज ठाकरे यांच्या इशा-यानंतर मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवले आहे.

( हेही वाचा: भाजपने खासदारांना जारी केला व्हीप; लोकसभेत हजर राहण्याचे दिले निर्देश )

मजारीवरील कारवाईनंतर मनेसेची प्रतिक्रिया

राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलाला होता. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला कोणत्याही प्रकारे थारा द्यायला नको. प्रशासनाने ज्या तत्परतेने कारवाई केली, आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. पण मागच्या दोन वर्षांत ज्याप्रकारे अक्षम्यरीत्या या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले. मविआच्या काळात ज्याप्रकारे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, हा संशोधनाचा विषय आहे, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

 

First Published on: March 23, 2023 12:13 PM
Exit mobile version