विधानपरिषद निवडणूक मतमोजणीवेळी दोन मते बाद, मविआ आणि भाजपाला मोठा धक्का

विधानपरिषद निवडणूक मतमोजणीवेळी दोन मते बाद, मविआ आणि भाजपाला मोठा धक्का

प्रातिनिधिक छायाचित्र

विधानपरिषद निवडणूक मतमोजणीवेळी आक्षेप घेतल्याने दोन मते बाद झाली आहेत. भाजपच्या उमेदवार उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मतपत्रिकेवर खाडाखोड आढळल्याने आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे ही दोन मते बाजूला ठेवण्यात आली. परिणामी मतमोजणी रखडली. त्यानंतर ही दोन्ही मते बाद करण्यात आली. त्यामुळे मविआ आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

दोन मते बाद झाल्याने आता २८३ मते वैध ठरली आहेत. यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा २५.७१ वर आला आहे. विधानपरिषद निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. त्यानंतर मतमोजणी सुरू झाल्यावर नवा वाद निर्माण झाला. रामराजे नाईक निंबाळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देण्यात आलेल्या मतपत्रिकेवर खाडाखोड झाल्याने भाजपचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आमदार आशिष शेलार यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे शेलार आणि मविआच्या मतमोजणी प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. परिणामी मतमोजणी रखडली.

त्यानंतर भाजपच्या उमेदवार उमा खापरे यांच्या पहिल्या पसंतीचे मत देण्यात आलेल्या मतपत्रिकेवर खाडाखोड झाल्याने मविआने यावर आक्षेप घेतला. त्यामुळे हे मतही बाजूला काढण्यात आले. त्यानंतर ही दोन्ही मते बाद ठरवण्यात आली. मते बाद करण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी आणि भाजप आता निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहेत. त्यामुळे मतमजोणी लांबणार आहे.

 

First Published on: June 20, 2022 8:41 PM
Exit mobile version