उध्दव ठाकरेंसोबत धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो, पुण्यात रंगली बॅनरबाजी

शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे सेनेत उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे दोन तट निर्माण झाले आहेत. ही लढाई न्यायालयाच्या तसचे निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान आम्हीच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करण्यासाठी दोनही गटाने कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवेसेनेच्या 40 आमदारांचा वेगळा गट तयार केला. यानंतर त्यांच्या प्रत्येक भाषणात, सभेत, तसेच बॅनरवर त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच आहोत असा दावा करत प्रत्येक सभेला संबोधीत करतांना नेहमी बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या नावाने सभेची सुरूवात केली. यानंतर शिंदे गटाच्या प्रत्येक बॅनवर बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांचा फोटो आवर्जुन असतोच. मात्र विषेश लक्षणीय बाब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅनरवर देखील उद्धव ठाकरेंसोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

पुण्यातील बॅनरवरील फोटो 

बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा बंडखोर आमदार यांच्या तोंडातून वारंवार बाळासाहेबांच्या उल्लेखानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचा उल्लेख करण्यात येतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर आम्ही हिंदुत्वाची वाट धरली आहे असं शिंदे गटाकडून बोलण्यात येतं. मात्र आता शिवसेनेच्या बॅनरवरही धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो झळकल्याने या बॅनरची चर्चा रंगली आहे.

 

बॅनर का लावण्यात आला ?

आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात तयारी सुरू आहे. यानिमित्ताने पुण्यातील शिवसैनिकांनी अलका टॉकीज येथील चौकात उद्धव ठाकरे यांचा बॅनर लावला आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या संभाषणाचा एक मजकूर लिहीण्यात आला आहे ‘अखंड महाराष्ट्रा सदैव आपल्यासोबत’ बाळासाहेब ठाकरे यांनी ‘आनंद दिघे माझे कट्टर शिवसैनिक’ असं म्हटलं होतं. तर आनंद दिघे यांनी ‘माझी जात-गोत्र-धर्म फक्त शिवसेना’ असं म्हटलं होतं. हे दोन्ही उल्लेख या बॅनरवर करण्यात आले आहेत.

हे ही वाचा – ‘ट्रम्प महाशय ‘भान’ ठेवून…’ सामनातून थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल

 

 

First Published on: September 9, 2022 11:53 AM
Exit mobile version