Gujarat Election Result | अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकींच्या निकालाचा कल हाती येत आहे. हाती आलेल्या कलानुसार, सध्या भाजपाची विक्रमी बहुमताकडे वाटचाल स्पष्ट दिसत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपा १५२, काँग्रेस २०, आप ६ आणि अपक्ष चार जागांवर आघाडीवर आहेत. गुजरातच्या अनेक हॉट सीटवरही भाजपाच पुढे आहे. काँग्रेस आणि आपचा सुपडा साफ झाला असून सायंकाळपर्यंत गुजरात सत्तेच्या चावी कोणाच्या हाती जाईल याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान झाले आहे. या जागांसाठी १६२१ उमेदवारांनी निवडणूक लढवली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजासह अनेक नेत्यांसाठी आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. त्यानुसार, निकाल भाजपाच्या बाजूने दिसत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या कार्यालयांबाहेर शुकशुकाट दिसत असून भाजपाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी दिल्लीच्या भाजपा कार्यालयात जाणार आहेत.
हेही वाचा – गुजरातच्या गादीवर कोण बसणार? आप धक्का देणार की भाजपाचेच वर्चस्व राहणार?
कोणत्या मतदारसंघात कोणाची बाजी?
जागा उमेदवार पक्ष परिस्थिती
घाटलोडिया भूपेंद्र पटेल भाजपा पुढे
वीरमगाम हार्दिक पटेल भाजपा पुढे
वडगाम जिग्नेश मेवाणी काँग्रेस मागे
गांधीनगर दक्षिण अल्पेश ठाकोर भाजपा पुढे
अकोटा चैतन्य मकरंदभाई देसाई भाजपा पुढे
अम्रैवादी डॉ. हसमुख पटेल भाजपा पुढे
मजूरा हर्ष संधवी भाजपा पुढे
अबडासा जाट मामद जुंग काँग्रेस पुढे
अमराईवाडी डॉ. हसमुख पटेल भाजपा पुढे
अमरेली कौशिक कांतिभाई वेकरिया भाजपा पुढे
आणंद योगेश आर. पटेल (बापजी) भाजपा पुढे
अंजार छांगा त्रिकम बिजल भाजपा पुढे
आंकलाव गुलाबसिंह रतनसिंह पढियार भाजपा पुढे
अंकलेश्वर विजयसिंह ठाकोरभाई पटेल काँग्रेस पुढे
असारवा दर्शना एम. वाघेला भाजपा पुढे
बालासिनोर मानसिंह कोह्याभाई चौहाण भाजपा पुढे
वांसदा अनंतकुमार हसमुखभाई पटेल काँग्रेस पुढे
बापुनगर दिनेशसिंह राजेन्द्र सिंह कुशवाह भाजपा पुढे
बारडोली ईश्वरभाई भाजपा पुढे
बायड धवलसिंह नरेन्द्रसिंह जाला अपक्ष पुढे
बेचराजी ठाकोर सुखाजी सोमाजी भाजपा पुढे
भरूच रमेशभाई नारणदास मिस्त्री भाजपा पुढे
भावनगर पूर्व सेजलबेन राजीवकुमार पंडया भाजपा पुढे
भावनगर ग्रामीण परसोत्तमभाई ओ. सोलंकी भाजपा पुढे
भावनगर पश्चिम जीतेन्द्रभाई सवजीभाई वाघाणी भाजपा पुढे
भिलोडा रूपसीभाई बाबुभाई भगोरा AAP पुढे
बोरसद परमार राजेन्द्रसिंह धीरसिंह काँग्रेस पुढे
बोटाद मकवाणा उमेशभाई नारणभाई AAP पुढे
चाणस्मा ठाकोर दिनेशभाई आताजी काँग्रेस पुढे
छोटाउदेपुर राजेंद्रसिंह मोहनसिंह राठवा भाजपा पुढे
चोर्यासी संदीप देसाई भाजपा पुढे
चोटीला चौहान शामजीभाई भीमजीभाई भाजपा पुढे
डभोई शैलेषभाई कनैयालाल महेता भाजपा पुढे
दहेगाम चौहाण बलराजसिंह कल्याणसिंह भाजपा पुढे
दाहोद कनैयालाल बचूभाई किशोरी भाजपा पुढे
डांग्स विजयभाई रमेशभाई पटेल भाजपा पुढे
दाणीलीमडा नरेशभाई शंकरभाई व्यास भाजपा पुढे
दांता पारघी लातुभाई चांदाभाई भाजपा पुढे
दरियापुर कौशिकभाई सुखलाल जैन भाजपा पुढे
दसाडा नौशाद सोलंकी काँग्रेस पुढे
दसक्रोइ बाबूभाई जमनादास पटेल भाजपा पुढे
डेडीयापाडा चैतरभाई दामजीभाई वसावा AAP पुढे
डीसा लेबजीभाई ठाकोर निर्दलीय पुढे
दिओदर केशाजी शिवाजी चौहाण भाजपा पुढे
देवगढबारिया खाबड़ बचुभाई मगनभाई भाजपा पुढे
धंधुका कालुभाई रूपाभाई डाभी भाजपा पुढे
धानेरा मावजीभाई मगनभाई देसाई अपक्ष पुढे
धरमपुर अरविंद छोटुभाई पटेल भाजपा पुढे
धारी काकडीया जयसुखभाई वल्लभभाई भाजपा पुढे
धोलका किरीटसिंह सरदारसंग डाभी भाजपा पुढे
धोराजी डॉ. महेन्द्रभाई पाडलिया भाजपा पुढे
ध्रांगध्रा प्रकाशभाइ परसोतमभाइ वरमोरा भाजपा पुढे
द्वारका पबुभा विरमभा माणेक भाजपा पुढे
एलिसब्रिज अमीत शाह भाजपा पुढे
फतेपुरा कटारा रमेशभाई भूराभाई भाजपा पुढे
कलावड़ (एससी) — भाजपा पुढे
जामनगर ग्रामीण — भाजपा पुढे
जामनगर उत्तर — AAP पुढे
जामनगर दक्षिण —- भाजपा पुढे
जामजोधपुर —– भाजपा पुढे
मांडवी अनिरुद्ध भाईलाल दवे भाजपा पुढे
अंजार छंगा त्रिकम बिजल भाजपा पुढे
गांधीधाम मालती किशोर माहेश्वरी भाजपा पुढे
रैपर भचुभाई धर्मशी आरेठिया काँग्रेस पुढे
वाव ठाकोर जेनीबेन नागाजी काँग्रेस पुढे
थराड गुलाबसिंह पीराभाई राजपूत काँग्रेस पुढे
धनेरा पटेल नथाभाई हेगोलाभाई काँग्रेस पुढे
दंत कांतिभाई कलाभाई खराड़ी काँग्रेस पुढे
कांकरेज वाघेला कीर्तिसिंह प्रभातसिंह भाजपा पुढे
राधनपुर रघुभाई मेराजभाई देसाई काँग्रेस पुढे
चनास्मा विष्णुभाई जोराभाई पटेल AAP पुढे
खेरालू देसाई मुकेशकुमार मोंगजीभाई काँग्रेस पुढे
खंभालिया इसुदान गढ़वी AAP पुढे
जामनगर रिवाबा जडेजा भाजपा पुढे
कतारगाम गोपाल इटालिया AAP पुढे
मोरबी कांति अमृतिया भाजपा पुढे
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात आज 93 जागांवर मतदान झाले. गुजरातमध्ये 33 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सुमारे 63.31 टक्के मतदान झाले. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) व्यतिरिक्त इतर 36 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केलेत. एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. यामध्ये 339 अपक्षांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस हे सर्व 89 जागांवर लढले आहेत. तर 88 जागांसाठी आपचे उमेदवार रिंगणात आहेत. सुरत पूर्व मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. इतर पक्षांपैकी BSP ने 57, BTP 14 आणि CPI(M) ने चार उमेदवार उभे केलेत.
काँग्रेस, भाजपा आणि आप या तीन पक्षांमध्ये कडवी लढत झाली आहे. आपने दिल्लीत भाजपाचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे गुजरातमध्येही आप मुसंडी मारणार का हे पाहावं लागणार आहे.