कृषीपंप वीज जोडणी धोरण प्रसारासाठी पेण येथे कृषी ऊर्जा पर्व

कृषीपंप वीज जोडणी धोरण प्रसारासाठी पेण येथे कृषी ऊर्जा पर्व

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीज जोडणी, दिवसा आठ तास सौरकृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट,कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती आणि सहकारी साखर कारखान्याच्या सहभाग व कृषी ग्राहकाच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी जाहीर केले आहे. ग्राहकापर्यंत पोहचण्यासाठी राज्यभर 1 मार्च 2021 पर्यंत ‘कृषि पर्व’ राबवले जात असून महावितरणच्या भांडुप परिमंडळांतर्गत पेण मंडळ कार्यालयात कृषी ऊर्जा पर्वाचे आयोजन करण्यात आले होते.

या मध्ये पेण मंडळातील ज्या शेतकऱ्यांनी आपली संपूर्ण वीज बिलाची थकबाकी भरली आहे किंवा या अभियान अंतर्गत नवीन वीज जोडणी घेतली आहे तसेच नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत. अशा शेतकऱ्यांना पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी, पेण मंडळचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पर्वाचा शुभारंभ 2 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइनद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तानपुरे, प्रधान सचिव ऊर्जा, दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले. यामध्ये पाली येथील कृषी ग्राहक रोशन रुईकर यांनी सौर ऊर्जा द्वारे नवीन वीज जोडणी घेतली आहे. म्हणून त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पेण मंडळात ‘कृषी ऊर्जा पर्व’ अंतर्गत अलिबाग येथील रवींद्र घरात आणि अरुण गणपत माळवी यांचे सत्कार करण्यात आले. तसेच स्वप्नील वनगे, नरेश थळे, विनोद मोरे आणि नंदकुमार ठाकूर यांना नवीन वीज जोडणी मंजुरीचे कोटेशन प्रदान केले. यावेळी, पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करून कृषी धोरण 2020 बाबत माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना माहिती देऊन या संधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. या अभियानात, याच प्रकारे जिल्हा, तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये कृषी वीज ग्राहक मेळावे आयोजित केले जाणार आहे. यात ‘माझे वीज बिल माझी जबाबदारी’ मोहिमेस सुरवात झाली असून थकबाकी मुक्त झालेला ग्राहकांचा सत्कार, नवीन कृषी ग्राहकांना वीज जोडणी मंजुरीचे कोटेशन वीज जोडणी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

याबरोबरच ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेच्या समन्वयाने ग्रामसभा आयोजित करून त्यात कृषी धोरणाची माहीती दिली जाणार आहे. महिला सक्षमीकरण महावितरणचा पुढाकार या संकल्पने अंतर्गत 8 मार्च रोजी जागतिक महिला दीनाचे औचित्य साधून थकबाकी भरणाऱ्या महिलांच्या नावावर वीज जोडणीस प्राधान्य, थकबाकी वसुली करणाऱ्या महिला सरपंचांचा तसेच महिला जनमित्राचा आणि उर्जामित्रांचा सत्कार महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभागातून अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी महिला बचत गटांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. भांडुप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी अधिकाअधिक कृषी ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावे व थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन केले.

First Published on: March 3, 2021 9:42 PM
Exit mobile version