जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी; १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी; १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

पाली: सर्व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत मधील कर्मचारी व शिक्षक १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सुधागड तालुका अध्यक्ष जावेद जमादार यांच्या नेतृत्वाखाली खाली संघटनेच्या पदाधिकारी यांनी सोमवारी सुधागड पाली येथे तहसिलदार उत्तम कुंभार यांना निवेदन सादर केले.
या वेळी मध्यवर्ती संघटना सुधागड तालुका राज्य मध्यवर्ती संघटना अध्यक्ष जावेद जमादार, सरचिटणीस कमलेश गुंड, ज्ञानेश्वर बोडके, श्रीकांत इचके, श्रेया रावकर, सुनिता डाके, सरला क-हाळे, योगेश पवार, अमित यरवट, मच्छिंद्र शेवाळे, मोरे तात्या, खंकल, लक्ष्मी पाटील, अनंता वारगुडे, जयश गायकर,सचिन केंद्र,मयुर कारखानीस,कांबळे, मयेकर, अरुण शिंदे, राजेंद्र देसाई, यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने दिनांक १ नोव्हेंबर २००५ पासून शासकीय सेवेत येणार्‍या कर्मचारी यांना नविन राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली आहे. ही योजना अन्यायकारक असुन सर्वाना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या मागणी करीता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सातत्याने विविध आंदोलन करीत आहे. या अन्यायकारक योजने विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व घटक संघटना यांनी विविध आंदोलने केली आहेत.

First Published on: February 27, 2023 10:19 PM
Exit mobile version