Nargis Antule : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचे निधन

Nargis Antule : माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचे निधन

रायगड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे बुधवारी (20 मार्च) रात्री उशीरा वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ए.आर. अंतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती. दरम्यान, आंबेत येथील मूळगावी असलेल्या निवासस्थानी नर्गिस यांच्यावर अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा मोठा परिवार आहे. (Nargis Antule Former Chief Minister Barrister Antules wife passed away)

हेही वाचा – Nitesh Rane : …तर त्यांना रोज औरंगजेब आठवेल; मोदींवरील राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

नर्गिस आणि बॅरिस्टर अंतुले यांचा 1957 साली लग्न झाले होते. बॅरिस्टर अंतुले जेव्हा पहिल्यांदा नर्गिस यांना भेटले, तेव्हा ते पहिल्या नजरतेच नर्गिस यांच्या प्रेमात पडले आणि प्रेमाचा होकार कळविला होता. मात्र त्यावेळी नर्गिस या केवळ 16 वर्षांच्या होत्या. त्यामुळे बॅरिस्टर अंतुले यांनी 4 वर्षे वाट पाहिली. त्यानंतर नर्गिस यांच्या वयाच्या 20 व्या वर्षी दोघांनी अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न केले. बॅरिस्टर अंतुले यांचे 2014 साली निधन झाले. मात्र 1957 पासून 2014 पर्यंत दोघांनी सुखी संसार केला. मिस्टर अँड मिसेस अंतुले यांच्या बहारदार प्रेमाच्या नात्याची सगळ्यांना भुरळ होती. दोघेही मुंबईतील चर्चगेट परिसरात वास्तव्य होते. नर्गिस यांना लिखाणाची वाचनाची आवड होती. त्यामुळे बॅरिस्टर अंतुले हे नर्गिस यांना अनेक प्रेमपत्रे लिहायचे. ती प्रेमपत्रे एकांतात चाळणे, वाचणे आणि त्यांच्या आठवणीत रमून जाणे हे नर्गिस यांना फार आवडायचे.

हेही वाचा – CM Eknath Shinde : विरोधकांवर टीका करा पण…, मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना पदाधिकारी, प्रवक्त्यांना सूचना

अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नर्गिस अंतुले यांना ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले की, माजी मुख्यमंत्री, राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात भक्कम साथ देणाऱ्या, त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. कोकणचा विकास, अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या गेल्या साठ वर्षांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीतील एक महत्त्वाचा साक्षीदार आपण गमावला आहे. पुत्र नविद यांच्या निधनानंतर अंतुले परिवारासाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना, कार्यकर्त्यांना मिळो अशी प्रार्थना करतो. नर्गिस अंतुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्ती केली आहे.

First Published on: March 21, 2024 3:25 PM
Exit mobile version