घरमहाराष्ट्रNitesh Rane : ...तर त्यांना रोज औरंगजेब आठवेल; मोदींवरील राऊतांच्या टीकेला नितेश...

Nitesh Rane : …तर त्यांना रोज औरंगजेब आठवेल; मोदींवरील राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना मोगल घराण्यातील सहावा बादशहा औरंगजेबशी केली आहे. यावरून भाजपा संतप्त झाली असून त्यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी इशारा देताना म्हटले की, राऊतांनी त्याचे थोबाड बंद केलं नाही, तर उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल की, मग रोज त्यांना औरंगजेब आठवेल. (then they will remember Aurangzeb everyday Nitesh Ranes response to Sanjay Raut’s criticism of Narendra Modi)

हेही वाचा – Ajit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरे युतीत येणार असतील तर…, काय म्हणाले अजित पवार?

- Advertisement -

नितेश राणे यांनी म्हटले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना औरंगजेबाच्या बाजूला दोन कबरी खोदून घेण्याची घाई लागली आहे. ते जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील तेवढे ते खड्ड्यात जातील. आता राऊतांनी त्याचं तोंड बंद केलं नाही, तर उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या मुलाची अशी माहिती महाराष्ट्रासमोर दिली जाईल की, मग रोज त्यांना औरंगजेब आठवेल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.

मोदींची औरंगजेबाशी तुलना करणे म्हणजे देशभरातील नागरिकांचा अपमान करण्यासारखे आहे. जी धार्मिक स्थळं काँग्रेसच्या काळात अंधारात होती. त्यांना उजेडात आणण्याचं काम मोदींनी केलं आहे. सुपारीबाज राऊताला भाजपासोबत उद्धव ठाकरेंनी युती करू नये म्हणून काँग्रेसने राऊतांना सुपारी दिली आहे. मोदींनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी दिला आहे. स्वार्थाचा दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आहेत, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Adah Sharma : गुलाबी साडी गाण्यावर अदा शर्माचा आजीसोबत डान्स

राज ठाकरेंचा महायुतीत येण्याचा निर्णय स्वागतार्ह

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, राज ठाकरेंचा महायुती सोबत येण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. हिंदुत्वाचा विचार सर्वांना सोबत घेऊन महायुती भक्कम होत असेल आणि राज ठाकरेंना आम्ही घेतलं तर विरोधकांना मिरच्या का लागल्या? तुम्ही वंचित आघाडीला घेता ते चालते का? असे प्रश्नही नितेश राणे यांनी विचारले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -