’चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत पाताळगंगा नदीचे पूजन; खालापूरात स्तुत्य उपक्रम

’चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत पाताळगंगा नदीचे पूजन; खालापूरात स्तुत्य उपक्रम

खोपोली: नदीत वाढत असलेले प्रदूषण, अतिक्रमण रोखण्यासाठी नदी बाबत नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, केएमसी कॉलेज खोपोली तसेच खालापूर तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘चला जाणूया नदीला’ अभियान अंतर्गत पाताळगंगा नदीचे पूजन नायब तहसिलदार सुधाकर राठोड, कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील यांच्या हस्ते पुंडलिक मंदिर येथे करण्यात आले तर धाकटी पंढरीच्या मैदानात स्वच्छता मोहिम राबवली.

पातळगंगा नदी काठी असलेल्या पुंडलिक मंदिर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नायब तहसिलदार सुधाकर राठोड,कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील,पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरूण जाधव,एनसीसी युनिटच्या कँप्टन शितल गायकवाड यांच्यासह एनसीसीच्या विद्यार्थीनी तसेच खोपोली नगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
पाताळगंगा नदी पात्राचे पूजन नायब तहसिलदार सुधाकर राठोड,काँलेजचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासनाने ‘चला नदी जाणूया’ उपक्रम चालू केला आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, प्रांताधिकारी अजित नैराळे,खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमातंर्गत नदीचे पूजन केले असल्याची माहिती नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांनी दिली. पाणी हे जिवणाचे स्त्रोत आहे.त्यामुळे पाणी दूषीत करून चालणार नाही असे सांगत पाण्याचे महत्व के.एम.सी कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रताप पाटील यांनी पटवून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

नदीतील प्रदुषण आणि पर्यावरण कमी करणे,नदी पात्रातील अतिक्रमण रोखण्यासाठी आणि नदी स्वच्छता अभियान शासनाने सुरू केले.खालापूर तालुक्यात मोठी औद्योगिक वसाहत आहे. कारखान्यातील टाकावू पदार्थ,रसायनयुक्त पाणी सोडू नये यासाठी प्रशासन म्हणून आमची जबाबदारी असली तर नागरिकांनी नदी स्वच्छता ठेवली पाहिजे या जनजागृतीसाठी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, केएमसी कॉलेज खोपोली उपक्रम राबविल्याबद्दल धन्यवाद.
– सुधाकर राठोड,
नायब तहसिलदार,खालापूर

First Published on: January 24, 2023 10:03 PM
Exit mobile version